ते वीज विक्रीतून महारोगींकरिता उभारणार होते व्यापार आणि झाले हे...वाचा 

रूपेश खैरी 
सोमवार, 29 जून 2020

तब्बल 32 एकरात उभा होणाऱ्या या प्रकल्पातून आठ मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. एक मेगावॉट विजनिर्मितीकरिता चार एकर जागा व्यापणार आहे. याकरिता लागणारा खर्च या अभियंत्याच्या माध्यमातून होणार होता. संस्थेला त्याचा कुठलाही त्रास नसल्याने या प्रकल्पाला संस्थेकडून हिरवी झेंडी देण्यावर तयारी सुरू होती

वर्धा : दत्तपूर येथील महारोगी संस्थेत सौरऊर्जा प्रकल्प उभारून त्यातून वीज विक्री करून मिळणाऱ्या पैशातून महारोगींना त्यांच्या पायावर उभे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून गुडगाव येथून वर्ध्यात आलेल्या अभियंत्याचा कोरोनोन मृत्यू झाला. या मृत्यूने या अभियंत्याचेच नाही तर कुष्ठरोगाने जीवन हरलेल्या दत्तपूर येथील महारोगींच्याही स्वप्न सध्या तरी भंगले आहे. 

क्लिक करा - तेरी बहन बहोत माल दिखती हैं', हे ऐकताच तो संतापला आणि... 
 

दत्तपूर येथील महारोगी संस्थेला ऐतिहासिक महत्त्व आहे. या संस्थेला महात्मा गांधी यांनी उभे केले. यामुळे येथे अनेक समाजसेवी संस्थांकडून भेटी दिल्या जातात. येथे अनेकांकडून समाजसेवाही केली जाते. याच समाजसेवेच्या भावनेने देशात एकत्र आलेल्या 25 अभियंत्यांच्या चमूने येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. याकरिता लागणारे सर्वच भांडवल ते स्वत: उभारणार होते. त्याचा सर्व्हे करण्याकरिता हा अभियंता आपल्या पत्नीसह आला होता. त्यांच्याकडून या प्रकल्पाकरिता आवश्‍यक सर्व्हे पूर्ण झाला आणि त्याचा अहवाल संस्थेकडे देण्यात आला होता. 
तब्बल 32 एकरात उभा होणाऱ्या या प्रकल्पातून आठ मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. एक मेगावॉट विजनिर्मितीकरिता चार एकर जागा व्यापणार आहे. याकरिता लागणारा खर्च या अभियंत्याच्या माध्यमातून होणार होता. संस्थेला त्याचा कुठलाही त्रास नसल्याने या प्रकल्पाला संस्थेकडून हिरवी झेंडी देण्यावर तयारी सुरू होती. हा प्रकल्प उभा झाल्यास येथे वीज निर्मिती करून तिचा वापर आणि विक्री करण्यात येणार आहे. यातून वाचणाऱ्या आणि विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून येथे राहणाऱ्या महारोगींना त्यांच्या पायावर उभे करण्याचा त्यांचा मानस होता. त्यांचा हा संकल्प त्यांच्या सोबतच जाणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...
 

वर्षाकाठी वाचणार संस्थेचे सहा लाख 
दत्तपूर येथे 32 मेगावॉट वीजनिर्मिचा प्रकल्प सुरू झाल्यास महारोगी संस्थेचे वर्षाकाठी सहा लाख रुपये वाचणार आहेत. शिवाय यातून होणाऱ्या वीज विक्रीतून मोठी रक्‍कम मिळणार आहे. यातून येथे वास्तव्यास असलेल्या महारोगींकरिता व्यवसाय सुरू करण्याची त्यांची इच्छा होती. 

इतर सहकारी करणार स्वप्नाची पूर्ती 
महारोगी संस्थेत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगून अखेरचा निरोप घेणाऱ्या या अभियंत्याचे इतर मित्र हा प्रकल्प पूर्णत्वास नेणार आहेत. सूरत येथील अल्लेश देसाई हे या अभियंत्यांच्या समूहाचे प्रमुख आहेत. प्रकल्पाचे राहिलेले काम ते पूर्ण करणार आहेत. 

दत्तपूर येथील महारोगी संस्थेत उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचा संस्थेला मोठा लाभ होणार आहे. यातून वीजबिलाच्या रकमेची बचत होईल आणि शिल्लक असलेल्या विजेची विक्री होणार आहे. या विक्रीतून महारोगी सेवा संस्थेत वास्तव्यास असलेल्या कुष्ठरोग्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे स्वप्न बाळगून हा अभियंता येथे पत्नीसह दाखल झाला होता. त्याच्याकडे असलेली जबाबदारी पार पाडून हा अभियंता काळाच्या पडद्याआड झाला. त्याचे अर्धवट राहिलेले हे स्वप्न त्याचे सहकारी पूर्ण करणार आहेत. याकरिता संस्थेकडून लवकरच परवानगी देण्यात येणार आहे. 
- ओमप्रकाश त्रिवेदी, सचिव, महारोगी दत्तपूर सेवा संस्था वर्धा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He was going to set up a trade for lepers from selling electricity and it happened ... read on