

esakal
Buldana District Video : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे दारूच्या नशेत शाळेत येऊनच धिंगाणा घालत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. दरम्यान या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षकाचा कारनामा उघड झाला आहे.