संतापजनक, महिला डॉक्टरने वृद्ध महिलेला शिबिरातून हाकलले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णाचे डोळे तपासण्यात येतात. याकरिता तालुक्‍यातील ग्रामीण भागातील शेकडो वयोवृद्ध ग्रामीण रुग्णालयात येतात. आज डोळे तपासणीसाठी अनेक महिला रुग्णालयात दाखल झाल्या. महिला डॉक्‍टरांनी एक एक महिलांना बोलावीत डोळे तपासण्याचे काम सुरू केले. अशातच एका महिलेची तपासणी सुरू असताना तिला समोर बघितल्यास सांगण्यात आले. 

गोंडपिपरी (चंद्रपूर) :  डोळे तपासणीकरिता आलेल्या वृद्ध महिलेला महिला डॉक्‍टरांनी हात धरून बाहेर काढले. यामुळे रुग्ण महिला विरुद्ध महिला डॉक्‍टर असा सामना चांगलाच  रंगला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झाले. गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.

दर शुक्रवारी गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णाचे डोळे तपासण्यात येतात. याकरिता तालुक्‍यातील ग्रामीण भागातील शेकडो वयोवृद्ध ग्रामीण रुग्णालयात येतात. आज डोळे तपासणीसाठी अनेक महिला रुग्णालयात दाखल झाल्या. महिला डॉक्‍टरांनी एक एक महिलांना बोलावीत डोळे तपासण्याचे काम सुरू केले. अशातच एका महिलेची तपासणी सुरू असताना तिला समोर बघितल्यास सांगण्यात आले. 

 

अक्षराने केला घात 

यावेळी तिने काही अक्षरांची ओळख सांगितली. मात्र काही अक्षर तिला दिसले नाही. यावरून महिला रुग्णाने असभ्य बोलल्याचा ठपका ठेवीत महिला डॉक्‍टरने रुग्णाला हात धरून बाहेर काढले. यानंतर रुग्णालयाबाहेर महिला रुग्ण व डॉक्‍टर यांच्यात चांगलाच सामना रंगला. याप्रकरणात रुग्ण कल्याण समितीचे सदस्य साईनाथ मास्टे यांनी महिला डॉक्‍टरांना समजविण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्‍टरांनी मास्टेच्या भाष्यावर आक्षेप घेत रडायला लागल्या. 

हे वाचा— शेतकऱ्यांसाठी सरकारची तयारी जोमात; पण साठवणूक करणार कुठे?

पोलिसांनी केली मध्यस्थी 

सोबतच महिला रुग्णाच्या अंगावर धावून गेल्या. शेवटी साईनाथ मास्टे यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस पोहचले. त्यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. महिला डॉक्‍टरने महिला रुग्णांना अशापध्दतीने हात धरून बाहेर काढणे, असभ्य बोलणे अतिशय निंदणीय असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थित रुग्णांनी दिल्या. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत पेंदाम हे यावेळी शासकीय कामामुळे बाहेर होते. एरव्ही गेल्या अनेक दिवसापासून शांत असलेल्या रुग्णालय प्रशासनाच्या कारभारामुळे रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे. 

सामान्य,गरीब वयोवृद्धांना सन्मान व आस्थेने तपासणी करण्याचे सोडून त्यांचा हात धरून बाहेर काढणे, हा प्रकार अतिशय निंदणीय आहे.याप्रकरणी कार्यवाही करावी. तसेच असे प्रकार होऊ नयेत याची प्रशासनाने काळजी घ्यावी. 
संजय झाडे,माजी नगराध्यक्ष ,गोंडपिपरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health camp matter reached to police station in chandrapur