हिंगोली : आरोग्य सेवा देऊन संपात सहभाग

hospital
hospital

हिंगोली : येथील शासकिय रुग्णालयात वाढत जाणारी रुग्ण 
संख्या लक्षात घेता शासकिय रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी 
सोमवारी (ता.९) संपात सहभाग नोंदवला असला तरी रुग्णांवर मात्र 
उपचार करून माणुसकीचा प्रत्यय दाखवून दिला आहे. 

राज्यात सन २००५ नंतर शासकिय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना 
जूनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील वेतनत्रुटी 
दुर  कराव्यात, खाजगीकरण व कंत्राटीकर धोरण रद्द करावे यासह 
इतर मागण्यांसाठी शासकिय व निमशासकिय कर्मचाऱ्यांनी सोमवारी 
(ता. ९) एक दिवसाचा लाक्षणीक संप पुकारला आहे. या संपामध्ये
सर्वच शासकिय व निमशासकिय कार्यालयातील कर्मचारी सहभागी 
झाले आहेत. 

दरम्यान, शासकिय रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी देखील या 
संपात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सकाळी 
कर्मचारी संघटनेच्या ज्योती पवार, नलीनी बेंगाळ, अर्चना महामुने, 
वंदना पांचाळ, मुन्नी अलग, आनंदी बेंगाळ, सुनीता पुंडगे, रत्ना बोरा, 
जयश्री शेजवळ, संगीता लोखंडे, सुवर्णमाला टापरे, अशोक 
क्षिरसागर, नितीन पांढरे, संदीप धुळे यांच्यासह कर्मचारी शासकिय 
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारवर एकत्र आले. त्यामुळे रुग्णसेवा ठप्प होत 
असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी रुग्णांची हेळसांड होऊ नये 
यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु करून रुग्णसेवा देऊन माणुसकीचे 
दर्शन घडविले. कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ संपल्यानंतर दुपारी दोन 
वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात 
सहभागी होण्याचा निर्णय या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यांच्या या 
निर्णयाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी स्वागत करीत आभार व्यक्त 
केले. 

रुग्णसेवेला प्राधान्य- 

शासकिय रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातून रुग्ण येत आहेत. एक 
दिवस संपात सहभाग नोंदविल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णांची 
हेळसांड होते. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 
मात्र सर्वच कर्मचारी रुग्णसेवा देऊन संपात सहभागी आहोत. आरोग्य 
कर्मचाऱ्यांकडून रुग्णसेवेलाच प्राधान्य दिले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com