आरोग्य धोरण तयार करताना आयएमएला विश्‍वासात घ्या - डॉ. रवी वानखेडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नागपूर - आपल्याकडील धोरण निर्मिती करणारे पाश्‍चिमात्य देशांमध्ये काहीतरी बघतात आणि बाबूगिरी करीत धोरणे ठरवितात. मात्र, आरोग्यासंदर्भातील धोरणे व कायदे निर्माण करताना आयएमएला विचारात घ्यावे. विविध कायदे आणि जाचक अटींमुळे डॉक्‍टर घाबरलेले आहेत. तसेच आलेला रुग्ण आपल्यावर कधी केस करेल, हल्ला तर करणार नाही, या दहशतीखाली आहेत. राज्य सरकारने खासगी डॉक्‍टरांच्या अनुषंगाने आरोग्याचा जाहीरनामा प्रकाशित करावा, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले.

उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात पार पडलेल्या आयएमएच्या नागपूर शाखेच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. रवी वानखेडकर, आमदार डॉ. मिलिंद माने व महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. आशीष दिसावाल यांनी, तर डॉ. दिनेश अग्रवाल यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.

माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, डॉ. वैशाली खंडाईत, डॉ. प्रशांत राठी व डॉ. श्रद्धा दिसावाल उपस्थित होते. डॉ. वाय. एस. देशपांडे यांनी महाराष्ट्राने या महिन्यात ३ हजार सदस्य जोडल्याची माहिती दिली. आयएमएसमोर वैभवशाली भूतकाळ, आव्हानात्मक वर्तमान आणि उज्ज्वल भविष्य असल्याचे सांगत नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. आशीष दिसावल हे आव्हान पूर्णत्वास नेतील, असा विश्‍वास व्यक्त केला. पदग्रहण करणाऱ्या नवनिर्वाचित कार्यकारिणीत उपाध्यक्ष डॉ. सरिता उगेमुगे व डॉ. अभिजित अंभईकर, सचिव डॉ. दिनेश अग्रवाल, तर सहसचिव डॉ. शहनाज चिमथानवाला व डॉ. सचिन गाथे यांनी पदभार स्वीकारला. कोषाध्यक्ष डॉ. दिलीप अर्जुने यांनी पदग्रहण केले. २०१९-२० साठीचे अध्यक्ष म्हणून डॉ. कुश झुनझुनवाला यांची निवड करण्यात आली. संचालन डॉ. मनीषा राठी आणि डॉ. वर्षा झुनझुनवाला यांनी केले. डॉ. दिनेश अग्रवाल यांनी आभार व्यक्त केले.

डॉक्‍टर प्रामाणिक असतात. ते कामाबद्दल जागृत असतात व चांगले काम करतात. परंतु, आज ते कायद्याच्या दबावात काम करीत आहेत. आयएमएवर आणि डॉक्‍टरांवर संकट आल्यास विधानसभेत आवाज उठवणार. 
- डॉ. मिलिंद माने, आमदार.

Web Title: health policy IMA dr. Ravi Vankhedkar