आयुष्य जगण्याचा बोनस मिळाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

१०० टक्के ब्लॉकेज असलेल्या ८३ वर्षांच्या व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रिया 
हृदयाविकारावर बायपासपासून तर स्टेंट टाकून शस्त्रक्रिया होणे नवीन नाही. परंतु, वयाच्या ८३ व्या वर्षी ‘बायपास’ला बायपास करून रोटॅबोलेशन या अनोख्या तंत्राद्वारे हृदयातील १०० टक्के ब्लॉकेज काढण्याची शस्त्रक्रिया उपराजधानीतील वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्ये झाली. शस्त्रक्रियेनंतर ८३ वर्षांचे झोपूलाल यांच्याशी साधलेला संवाद. 

१०० टक्के ब्लॉकेज असलेल्या ८३ वर्षांच्या व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रिया 
हृदयाविकारावर बायपासपासून तर स्टेंट टाकून शस्त्रक्रिया होणे नवीन नाही. परंतु, वयाच्या ८३ व्या वर्षी ‘बायपास’ला बायपास करून रोटॅबोलेशन या अनोख्या तंत्राद्वारे हृदयातील १०० टक्के ब्लॉकेज काढण्याची शस्त्रक्रिया उपराजधानीतील वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्ये झाली. शस्त्रक्रियेनंतर ८३ वर्षांचे झोपूलाल यांच्याशी साधलेला संवाद. 

नागपूर - सायंकाळची वेळ होती. छातीत दुखू लागले आणि गाव सोडले. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच शुद्ध हरपली. तत्काळ डॉक्‍टरांनी एंजिओग्राफी केली. १०० टक्के ब्लॉकेज असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. रक्तवाहिन्यातील ब्लॉकेज डॉक्‍टरांनी दाखवले.  

तसे डोळे भरून आले; मात्र वय झाले. समाधान मानून हृदयावर दगड ठेवून परत फिरलो. लगेच डॉक्‍टर म्हणाले, शस्त्रक्रियेतून बरे होऊ शकता आणि जगण्याची आशा बळावली. शस्त्रक्रियेस होकार दिला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता ठणठणीत आहे मी. डॉक्‍टरांनी मला आयुष्य जगण्याचा बोनस दिला. ‘सिर्फ डॉक्‍टर नहीं ये भगवान का रूप हैं,’ असे सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. वोक्‍हार्ट हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन तिवारी यांनी रोटाबोलेशन तंत्राद्वारे ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

मध्य भारतात केवळ वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्येच ही शस्त्रक्रिया होत असून आतापर्यंत वोक्‍हार्टमध्ये २५ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. मात्र, ८३ वर्षांच्या झोपूलाल यांच्या रक्तवाहिन्यांत १०० टक्के ब्लॉकेज दूर करण्याची पहिलीच वेळ आहे. 

झोपूलाल मध्य प्रदेशातील असून त्यांनी डॉक्‍टरांचे आभार मानत संवाद साधला. ते म्हणाले, डॉक्‍टरांनी जोखमीची शस्त्रक्रिया असल्याचे सांगितले. जे होईल ते बघू, असे मनाशी ठरवले आणि डॉक्‍टरांवर विश्‍वास ठेवला. आज सर्वच कामे करीत आहेत. व्यापारी असल्याचे सांगताना आता डॉक्‍टरांनी सांगितलेली दिनचर्या जगत आहे, असे म्हणत डॉक्‍टरला थॅंक्‍यू म्हणाले. फॉलोअपसाठी आले असता त्यांनी संवाद साधला.

ज्या हृदयरुग्णांना ‘बायपास’ची गरज असते, अशा रुग्णांपैकी १० ते १२ टक्के वयस्क लोकांना रोटॅबोलेशन शस्त्रक्रियेतून स्टेंट टाकून ही शस्त्रक्रिया यशस्वी करता येते. ही शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची आहे. ‘ड्रिल मशीन’सारखे यंत्र असते. हे यंत्र रक्तवाहिनीत अडकलेले कॅल्शियम फोडण्याचे काम करते. विशेष असे की, दर मिनिटाला २ लाख वेळा हे यंत्र फिरते. चुरा झालेले कॅल्शियम मूत्रपिंडाच्या मार्गाने बाहेर पडते. यंत्र फिरताना थोडेजरी सरकले की, रक्तवाहिनी फुटण्याची जोखीम असते. 
- डॉ. नितीन तिवारी, हृदयरोगतज्ज्ञ, वोक्‍हार्ट हॉस्पिटल, नागपूर.

Web Title: heart surgery success life saving