Heatstroke : ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्षाला प्रारंभ

सध्या वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे तापमानात वाढ होत आहे.
Heatstroke department start in rural hospital
Heatstroke department start in rural hospitalsakal

मंगरूळपीर - सध्या वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे तापमानात वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण अधिक वाढलेले असल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात १ मार्च पासून उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे उष्माघात झालेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कावरखे यांच्या आदेशनुसार तसेच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीकांत जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार येथील ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष १ मार्च रोजी स्थापन करण्यात आले असून यामध्ये १० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीकांत जाधव यांनी उष्माघाताबाबत सांगितले की, वातावरणाचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असल्यास मानवी शरीराला त्रास होऊ शकतो. तसेच, तापमान आणि आद्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो, असेही त्यांनी नमूद केले. उष्णतेच्या लाटेचा अधिक त्रास उन्हात कष्टांची कामे करणाऱ्या लोकांना, वृद्ध व लहान मुलांना, स्थूल लोकांना, पुरेशी झोप न घेणाऱ्या लोकांना, गरोदर महिलांना, अनियंत्रित मधुमेह व हृदयरोग रुग्णांना व व्यसनी लोकांना होऊ शकतो.

उष्णतेची लक्षणे

कातडी लालसर होणे, ताप व डोके दुखणे, खूप घाम येणे, थकवा येणे, चक्कर व उलटी येणे या प्रकारची लक्षणे आढळल्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.

उष्माघातामध्ये काय करावे

पुरेसे पाणी प्यावे, प्रवासात पाणी सोबत ठेवावे, हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरावे, उन्हात जाताना टोपीखाली ओलसर कपडा ठेवावा, ओलसर पडदे, पंखा, कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवावे.

उष्माघातात हे करू नये

शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, कष्टांची कामे उन्हात करू नये, गडद रंगाचे व तंग कपडे घालू नये, मद्य, चहा, कॉफी व सॉफ्ट ड्रिंक टाळा, शिळे अन्न खाऊ नये, माणसांसोबत पक्षी, प्राणी व वनस्पतींची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. श्रीकांत जाधव यांनी मंगरुळपीर तालुक्यातील नागरिकांना केले आहे. यावेळी डॉ. ऋचा गुनागे, डॉ. अजमल, मुख्य प्रभारी परिचारिका सोळंके, शिल्पा जवके, सुषमा बिकट, प्रियंका सुर्वे, फारुखी, प्रकाश संगत यांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com