अकोल्यात घराला भीषण आग; घरासह गोठा जळून खाक

अकोल्यात घराला भीषण आग; घरासह गोठा जळून खाक

चतारी (अकोला) : पातूर तालुक्यातील सस्ती येथे राजेंद्र सदाशिव यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (ता.२१) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. तसेच त्यांच्या घराच्या जवळच असलेल्या सहदेव बंड यांच्या गोठ्याला आग पकडली यामध्ये त्यांचे शेतातील उपयोगी साहीत्य, जनावरांचा चारा आदी सर्व जळून खाक झाले. या आगीत राजेंद्र सदाशिव यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. आगीत त्यांच्या घरातील धान्य कपडे आदी सर्व जळून खाक झाले. यामध्ये राजेंद्र सदाशिव यांचे दोन लाखाचे तर सहदेव तुकाराम बंड यांचे ८० हजाराचे नुकसान झाले आहे. 

नेेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी सदाशिव, बंड कुटुंब सकाळीच शेतामध्ये गेले होते. घर जळून खाक झाल्याची माहिती गावकऱ्यांनी बंड यांना दिली. ते शेतातून येईपर्यंत घर पूर्णपणे जळून खाक झाले होते, गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केले, परंतु ते अपयशी ठरले. घटनेची माहिती मिळताच पातूरचे नायब तहसीलदार सै.एसनोद्दीन यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, पंचनामा करण्यात आला. यावेळी सरपंच कल्पना संजय वाडेकर, पोलिस पाटील अरुण बदरखे, ग्रामसेवक महादेव खंडारे, कोतवाल बाळू उपर्वट आणि गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. आगीचे अद्याप कारण कळू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com