सरकारच्या विरोधात चटणी भाकर आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers agitation

सरकारच्या विरोधात चटणी भाकर आंदोलन

मुंगळा : शासनाने अतिवृष्टीची मदत जाहीर करूनही ऐन दिवाळीत मुंगळा मंडळात एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. याचा निषेध व्यक्त करत मुंगळा येथील मंडल अधिकारी यांच्या कार्यालया समोर शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने शिंदे -फडणवीस सरकारच्या विरोधात चटणी भाकर आंदोलन करण्यात आले.

यावर्षी मुंगळा परिसरात सततच्या पावसामुळे व परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. मुंगळा मंडळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल असे आश्वासन शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिले होते.

परंतु शेतकऱ्यांना दिवाळी करिता कुठलीच मदत ही मुंगळा मंडळ मधील व १७ गावातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली नाही. यामुळे महाराष्ट्र सरकारचा विरोधात मंडल अधिकारी तलाठी कार्यालया समोर बहुसंख्य शेतकरी यांनी शांततेत चटणी भाकरी खाऊन निषेध आंदोलन केले.

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख उद्धवराव गाडे याच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात जाहीर निषेध करून शेतकऱ्यांनी रोडवर बसून चटणी भाकर आंदोलन केले. मुंगळा मंडळातील शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र सरकारचा निषेध केला.