वऱ्हाडला अतिवृष्टीचा फटका, हजारो हेक्टवरील शेती पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अकोला : वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांना गुरुवारी अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. नदी काठावरील हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. या पावसाने वऱ्हाडातील तिन्हा तालुक्यातील जलसाठ्यात वाढ झाली.

तब्बल 20 दिवस विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी पहाटेपासून वऱ्हात पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजतापासून तिन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पाच तासापेक्षा अधिक काळ कोसळलेल्या या पावसाने यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच नदी-नाले दूथडी भरून वाहू लागले. परिणामी नदी-नाल्यांच्या काठावरील शेती पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकासन झाले. 

अकोल्यात 28 मंडळात अतिवृष्टी 
अकोला जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार 28  मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सरासरी 85.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याने 45 घरांचे नुकसान झाले तर तीन दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला. अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला होता. अकोला जिल्ह्यात अकोला, बार्शीटाकळी,पातूर आणि मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक 158.6 मि.मी. पाऊस बार्शीटाकळी तालुक्यात नोंदविल्या गेला.

बुलडाण्यात नऊ तालुक्यांका फटका
बुलडाणा जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दमदार पाऊस झाला. त्याचा फटका नऊ तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्यात सरासरी 82 मि.मी. पाऊस झाला. बुलडाणा तालुक्यात 123.6 मि.मी. पाऊस पडला. याशिवाय चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी झाली. 

वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टी
वाशीम जिल्ह्यात गुरुवारी सर्व तालुक्यात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक फटका मानोरा आणि कारंजा तालुक्यांना बसला. जिल्ह्यात 95.71 मि.मी. पाऊस नोंदविल्या गेला. कारंजा तालुक्यात 128.57 आणि मानोरा तालुक्यात 124.30 मि.मी. पाऊस झाला. मंगरुळपीर तालुक्यात 91.29, रिसोड 73.13, मालेगाव 81.58 आणि वाशीम तालुक्यात 75.41 मि.मी. पावसाची नोंद झाली.

Web Title: heavy rain in varhad loss to agriculture