पुढील सहा दिवस विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

अकोला - पुढील सहा दिवस अकोल्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान विभाग नागपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील सहा दिवसांत जिल्ह्यात वादळ, अवकाळी पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. विशेषता: नदी, नाल्यांच्या काठावरील गावांना व शहरी भागातील पुराचा प्रभाव असलेल्या वस्त्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदी, नाले, तलाव, बंधारे यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला असून, त्यामध्ये पोहण्याचे किंवा पूरस्थितीत बाहेर पडण्याचे नागरिकांनी धाडस करू नये, अशा सूचना तालुका स्तरावरसुद्धा देण्यात आल्या आहेत.

Web Title: heavy rain warning