बैठकीला उशीरा पोहोचलो, पण मी शिवसेनेतच - हेमंत पाटलांचे स्पष्टीकरण

खासदार हेमंत पाटील; अपप्रचार न करण्याचे आवाहन
hemant patil statement i reached meeting late but I am in Shiv Sena uddhav thackeray yavatmal
hemant patil statement i reached meeting late but I am in Shiv Sena uddhav thackeray yavatmalsakal

यवतमाळ : मतदारसंघात ढगफुटी झाल्यामुळे नुकसानग्रस्त भागाच्या दौरा केल्याने मातोश्रीवर आयोजित खासदारांच्या बैठकीला आपण वेळेवर हजर राहू शकलो नाही. आपण बैठकीला उशिरा पोहोचलो असून खासदारांच्या हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी केल्याचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता. ११) रात्री दहा वाजता स्पस्ट केले. तसेच आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याने माध्यमांनी अपप्रचार करू नये, असे आवाहनही त्यानी यावेळी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मातोश्रीवर सेनेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भाने पक्षाची भूमिका ठरविण्याबाबत ही बैठक होती. या बैठकीला राज्यातील अनेक खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे खासदार बंडाचा तयारीत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील खासदार हेमंत पाटील व खासदार भावना गवळी यांच्याही नावांचा उल्लेख होता. खासदार हेमंत पाटील यांचा दिवसभर फोनही लागत नव्हता, त्यामुळे तेदेखील नॉटरीचेबल असल्याची अफवा सुरू झाली. अखेर रात्री त्यांनी मातोश्रीवर पोहोचल्यावर खुलासा केला. त्यांनी सांगितले की, गेल्या १६ वर्षांपासून नांदेडमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी महोत्सवाचे आयोजन केले जाते.

काल रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता, तसेच आज सकाळी ढगफुटी झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कर्तव्य म्हणून सर्वप्रथम लोकांच्या मदतीला जाणे गरजेचे होते. नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. मुंबईपासून आपण साडेसहाशे किलोमिटर दूर राहत असल्याने मातोश्रीवर पोहोचू शकलो नाही. बैठकीला अनुपस्थित असल्याचा माध्यमांनी अनव्यार्थ काढला. माझ्या बाबत चुकीच्या अफवा पसरवल्या. कृपया अशा अफवा पसरवू नका, मी सुरुवातीपासूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, शिवसेनेसोबतच राहणार आहे, असेही त्यांनी स्पस्ट केले. आपण बैठकीला पोहोचू शकत नसल्याचे पक्षप्रमुखाना आधीच सांगितले होते, असेही ते म्हणाले. या बैठकीत काय निर्णय झाले ते कळले नाही. राष्ट्रपती निवडणुकीबाबत पक्षाची जी भूमिका असेल तीच आपली असेल. आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करू, असेही खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com