बिल्डर हेमंत झाम यास अखेर अटक

बिल्डर हेमंत झाम यास अखेर अटक
नागपूर : कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला झाम बिल्डरचा संचालक हेमंत सिकंदर झाम (35) यास अखेर पोलिसांनी अटक केली. मागील अनेक दिवंसापासून गुन्हे शाखेचे युनिट क्र. 1 चे पथक हेमंत झामचा शोध घेत होते. शनिवारी पोलिसांना माहिती मिळाली की, हेमंत सोनेगाव ठाण्यांतर्गत साईनगरच्या आर्चिड ब्लूम अपार्टमेंटमध्ये लपून बसला आहे. माहिती मिळताच तात्काळ पोलिस पथकाने फ्लॅटवर धाड टाकून हेमंतला अटक केली. हेमंत, त्याचा काका मुकेश झाम व काकू महिमा झाम विरुद्ध धंतोली ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. हे प्रकरण नवोदय बॅंक घोटाळ्याचे आहे. मुकेश आणि महिमा अद्याप पोलिसांना गवसलेले नाहीत.
2010 मध्ये झाम बिल्डरतर्फे हिंगण्याच्या वागधरा येथील 30 एकर जमिनीवर कन्हैया सिटी नावाने टाऊनशिप बनविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. स्वस्त दरात रो हाउस, बंगलो आणि फ्लॅट विक्री करण्याचे आमिष दाखवून लोकांकडून मोठी रक्कम उकळण्यात आली. मात्र लोकांना ना घर मिळाले, ना पैसे परत देण्यात आले. त्रस्त होऊन ग्राहकांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार केली. झाम विरुद्ध 19 ऑक्‍टोबर 2015 ला सोनेगाव ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. जवळपास 400 ग्राहकांनी ग्राहक मंचकडे तक्रार केली होती. समन्स आणि वॉरंटनंतरही न्यायालयात उपस्थित न झाल्यामुळे जिल्हा ग्राहक मंचने झाम बिल्डरविरुद्ध अटक वॉरंटही जारी केले होते. 2 वर्षांपासून हेमंत पोलिसांपासून लपत फिरत होता. हायकोर्टानेही यावर नाराजी व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com