हर्षल लेकुरवाळे यांची आत्महत्या; मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी

Hershal Lekurwale demands suspension of officer responsible for suicide
Hershal Lekurwale demands suspension of officer responsible for suicide

वरुड (जि. अमरावती) : नागपूर येथील शांतीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत तथा वरुड येथील रहिवाशी शिपाई हर्षल केशव लेकुरवाळे यांच्या कुटुंबीयांस तत्काळ आर्थिक मदत देऊन पत्नीला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.

पोलिस शिपाई हर्षल लेकुरवाळे यांनी १९ डिसेंबर २०२० रोजी नागपूर येथील गिट्टीखदान पोलिस वसाहतीतील क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळेस ते कर्तव्यावर कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी, दीड महिन्याचा मुलगा व दिव्यांग वडील असे सामायिक कुटुंब आहे. लेकुरवाळे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून, उपासमार होत आहे.

लेकुरवाळे यांच्या घरात दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसून ते एकमेव कर्तापुरुष होते. आमदार देवेंद्र भुयार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन लेकुरवाळे यांच्या कुटुंबीयांना त्वरित शासकीय आर्थिक मदत मिळण्यात यावी व मृताची पत्नी ही निराधार झाल्यामुळे शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात तसेच लेकुरवाळे यांच्या मृत्यूची सखोल तपासणी करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली. देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस महासंचालक यांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com