ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू..!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

बाभूळगाव (जि. यवतमाळ) : तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से
पहुंचू मैं, जहां भी मेरी बुनियाद रहे तू,
ऐ वतन, वतन मेरे आबाद रहे तू..!
स्वातंत्र्याची फळे बिनदिक्कत चाखायला देणाऱ्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन ऑगस्टक्रांतीत सहभागी होणाऱ्या क्रांतिकारकांच्या कार्याला शुक्रवारी (ता.9) उमरी स्मारकात उजाळा देण्यात आला.

बाभूळगाव (जि. यवतमाळ) : तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से
पहुंचू मैं, जहां भी मेरी बुनियाद रहे तू,
ऐ वतन, वतन मेरे आबाद रहे तू..!
स्वातंत्र्याची फळे बिनदिक्कत चाखायला देणाऱ्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन ऑगस्टक्रांतीत सहभागी होणाऱ्या क्रांतिकारकांच्या कार्याला शुक्रवारी (ता.9) उमरी स्मारकात उजाळा देण्यात आला.
जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे होते. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करून स्वतंत्र भारत देणाऱ्या हुतात्मांच्या आठवणींचा हा दिवस असून याला टिकविण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून सदाशिवराव ठाकरे यांनी केले. भविष्यातील पिढ्या चारित्र्यसंपन्न राहाव्या यासाठी प्रयत्न करावे, असेही ठाकरे म्हणाले. यावेळी व्ही. आर. जाधव, गजानन बेजंकिवार, प्रज्ञा भुमकाळे, कार्यकारी अभियंता राजिव चव्हाण यांनीही विचार व्यक्त केले. स्वातंत्र्यसंग्राम सैनिक वामन चव्हाण, मेघराज छल्लाणी, माळवी, राऊत, पिसाळकर यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. 2017 मध्ये शहीद झालेले सैनिक मधुकर घोटेकर यांची पत्नी, आई-वडील यांचाही सन्मान करण्यात आला. संचालन शाखा अभियंता विलास चावरे यांनी केले, तर आभार प्रा. विकास टोणे यांनी मानले.
स्मारकाचे सौंदर्य खुलले
मागील काळात उमरी स्मारकाची दयनीय अवस्था होती. याचे बोलके चित्र "सकाळ'ने उजागर केले होते. याची दखल म्हणून स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी दोन वर्षांत 18 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून वीज व पाण्याची व्यवस्था आणि स्मारकाची रंगरंगोटी केल्याने येथील सौंदर्य खुलले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hey country, my country, you are inhabited!