बाजारांतील घाणींचे छायाचित्रे हायकोर्टात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नागपूर : पावसानंतर भाजी बाजारात किती घाण निर्माण होते, चिखल राहतो का, पाणी साचते का या संदर्भात बाजारांच्या परिस्थितीचे छायाचित्रे उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. शहरातील आठवडी बाजारातील ही खरी परिस्थिती सांगणारे बोलके छायाचित्रे न्यायालयीन मित्र ऍड. शशीभूषण वाहणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे.

या प्रकरणी उच्च न्यायालयाने सुमोटो ऍक्‍शन घेऊन कोर्ट मित्र म्हणून ऍड. वाहणे यांची नेमणूक केली. या याचिकेवर बुधवारी (ता. 21) न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. शहरात 10 अधिकृत बाजार आहेत, तर 23 अनधिकृत बाजार भरतात. तसेच, काही ठिकाणी दैनिक बाजार भरतात. याप्रमाणे शहरातील काही उड्डाणपुलांवरसुद्धा अतिक्रमण करून बाजार भरविला जातो. शहरातील आठवडी बाजारप्रकरणी उच्च न्यायालयाने सुमोटो ऍक्‍शन घेत 27 जुलै 2016 रोजी महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. यानंतर, वरिष्ठ वकील वाहणे यांनी महात्मा फुले मार्केट परिसरातील छायाचित्रे हायकोर्टात सादर केली होती. शहरात दैनंदिन आठवडी बाजार व अनधिकृत आठवडी बाजार आणि काही उड्डाण पुलांवर बाजार भरविला जातो.
आठवडी बाजार समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रस्त्यांवर सडका भाजीपाला, मास, पडलेले असतात. काही ठिकाणी या बाजारांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून जाते, असे ऍड. वाहणे यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते. आता त्यांनी परत बाजारांची दुर्दशा सांगणारी छायाचित्रे हायकोर्टात दाखल केली. दरम्यान, हायकोर्टाने ऍड. वाहणे यांना मानधन देऊ केले होते. मात्र, त्यांनी सामाजिक सुधारणेचे काम असल्यामुळे मानधन घेण्यास नकार दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Court photos of dirt in markets