पतीला हायकोर्टाचा दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नागपूर - डॉक्‍टर दाम्पत्यातील वादावर पडदा पाडत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीला दिलासा दिला. या प्रकरणी पतीविरुद्ध दाखल करण्यात आलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यात आला. 

नागपूर - डॉक्‍टर दाम्पत्यातील वादावर पडदा पाडत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीला दिलासा दिला. या प्रकरणी पतीविरुद्ध दाखल करण्यात आलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यात आला. 

अंकुर आणि नीता (दोन्ही नावे काल्पनिक) यांचे 9 मे 2014 रोजी वाशीम येथे लग्न झाले. लग्नानंतर दोन महिन्यांतच अनिता माहेरी निघून गेली. पती आणि सासू-सासऱ्यांनी हुंड्याची मागणी केली असून, छळ करत असल्याचा आरोप अनिताने लावला. दरम्यानच्या काळात, अंकुरने विवाहाधिकार पुनर्स्थापित करण्यासाठी नागपूर कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर, ही याचिका अमरावती येथे स्थानांतरित करण्यासाठी अनिताने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने अंकुर आणि अनितामधील वाद सामंजस्याने मिटण्याची शक्‍यता असल्याची बाब लक्षात घेता हे प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे पाठविले. मध्यस्थीमध्ये अंकुरने अनिताला 6 लाख रुपये भरपाई देण्यास मंजुरी दर्शविली. त्यानुसार कुटुंब न्यायालयाने 24 ऑक्‍टोबर 2016 रोजी त्यांना घटस्फोट मंजूर केला. 

परंतु, यापूर्वीच अनिताने अंकुर व सासू-सासऱ्यांविरुद्ध अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम 498-अ (हुंड्यासाठी छळ) अंतर्गत एफआयआर नोंदविला होता. त्यावरून प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. याविरुद्ध अंकुरने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत अर्ज मंजूर केला तसेच फौजदारी गुन्हा रद्द केला. अर्जदारांतर्फे ऍड. अमित बंड यांनी बाजू मांडली. 

Web Title: High Court relief to husband