हिंगाेली : चोविस तासानंतरही तरुणाचा शोध सुरू

वृत्तसंस्था
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

तालुक्यातील देवठाणा येथील तरुणाचा टनका बॅरेजेसमधील पाण्यात चोवीस तासानंतर ही शोध सुरूच असून, सोमवारी (ता. ९ ) विदर्भातील महानगाव येथील पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तींना पाचारण करण्यात आले आहे.

हिंगोली : तालुक्यातील देवठाणा येथील तरुणाचा टनका बॅरेजेसमधील पाण्यात चोवीस तासानंतर ही शोध सुरूच असून, सोमवारी (ता. ९ ) विदर्भातील महानगाव येथील पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तींना पाचारण करण्यात आले आहे.

तालुक्यातील देवठाण येथील शंकर जयाजी भोयर (वय २४ ) हा तरुण रविवारी (ता. ८) पहाटे साडेपाच वाजता इतर मित्रांसोबत व्यायामासाठी कापूरखेडा शिवारात गेला होता. त्यानंतर त्याने पोहण्यासाठी टनका बॅरेजेसमधील पाण्यामध्ये उडी मारली. मात्र तो पाण्यातून बाहेर आलाच नाही. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर देवठाणा येथील गावकरी तसेच कनेरगाव नाका चौकीचे पोलीस कर्मचारी व वाशिम पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रविवारी ( ता. ८) सकाळपासून पाण्यात त्याचा शोध सुरू केला होता. मात्र सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागलाच नाही.

दरम्यान, त्यानंतर रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी विदर्भातील महानगांव येथील पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तींना पाचारण करण्यात आले आहे. तत्पूर्वी गावकऱ्यांनी आज सकाळपासून पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू केली आहे. मात्र अद्याप पर्यंत त्यांचा शोध लागला नाही. महानगाव येथील पोहणारे व्यक्ती आल्यानंतर त्याचा शोध लागेल असे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingalei: A boy dead body searches continues after 24 hours in hingoli