स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

Hinganghat Bus Accident हिंगणघाटमध्ये बसच्या धडकेत १५ ते १७ वर्षांच्या तीन मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. तिघीही स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या अशी माहिती समोर येत आहे.
Three Teenage Friends Die on Way to Independence Day Event

Three Teenage Friends Die on Way to Independence Day Event

Esakal

Updated on

स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या ३ शाळकरी मुलींना बसनं चिरडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. वर्ध्यातील हिंगणघाट शहरात घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. आंबेडकर शाळेजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. यात दुचाकीवर असलेल्या तिन्ही शाळकरी मुलींचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com