Chandrayaan-3 : चांद्रयान-३ मोहिमेत हिंगणघाटची कन्या कोमल करणार छायाचित्रांसह महत्त्वपूर्ण माहितीचे संशोधन

चांद्रयान-३ मोहिमेत इस्रोच्या शास्त्रज्ञात हिंगणघाटची कन्या कोमल योगेश लोहिया पूर्वाश्रमीची कोमल नंदकिशोर करवा हिचा सहभाग
Hinganghat Komal yogesh lohiya will research important information including photographs Chandrayaan-3 mission isro science
Hinganghat Komal yogesh lohiya will research important information including photographs Chandrayaan-3 mission isro sciencesakal

हिंगणघाट (जि. वर्धा) : चांद्रयान मोहीम फत्ते करून संपूर्ण जगात भारताची मान उंचावली आहे. या चांद्रयान-३ मोहिमेत इस्रोच्या शास्त्रज्ञात हिंगणघाटची कन्या कोमल योगेश लोहिया पूर्वाश्रमीची कोमल नंदकिशोर करवा हिचा सहभाग आहे.

चांद्रयान-३ कडून मिळणारी छायाचित्रे आणि रोवर सेंसरच्या साहाय्याने उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे संशोधन करण्याची जबाबदारी इस्रोच्या ज्या चमूची आहे, त्यात कोमलचा सहभाग आहे. चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंग नंतरचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या संस्थेत कोमल शास्त्रज्ञ एसडी या पदावर कार्यरत आहे. या यशस्वी मोहिमेनंतर चांद्रयानकडून मिळणाऱ्या डाटाच्या आधारावर चंद्राच्या भूपुष्टाचा व एकूण भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करण्याची मोठी जबाबदारी या हिंगणघाटच्या कन्येवर आहे.

शालेय जीवनापासूनच शिक्षणात अतिशय तल्लख असलेल्या कोमलने येथील जीबीएमएम विद्यालयातून बारावी प्रावीण्यासह उत्तीर्ण केले. त्यानंतर तिने नांदेड येथील गुरू गोविंदसिंग शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत अभियांत्रिकीची पदवी मिळविली.

येथून एमटेक हे एनआयटी, अलाहाबाद येथून सुवर्णपदकासह उत्तीर्ण केले. या उच्चशिक्षणानंतर ती २०१७ मध्ये बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो) येथे अभियंता म्हणून रुजू झाली.

कोमल ही येथील स्व. नंदकिशोर रामगोपाल करवा यांची मुलगी आहे. ती लहान असतानाच पित्याला पोरकी झाली. मात्र आई संतोष करवा यांनी कोमलच्या शिक्षणात व्यत्यय येऊ दिला नाही. त्यांना कुटुंबाची साथ मिळाली.

आज ती एका मोठ्या मोहिमेत योगदान देत आहे. कोरोना काळात हिंगणघाट येथे अत्यंत साध्या पद्धतीने तिचे लग्न जालना येथील योगेश लोहिया यांच्या सोबत झाले. तिचे पती योगेश हे मॅनेजमेंट कंसल्टंट असून बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत.

चांद्रयान -२ मध्येही होता सहभाग

उच्चशिक्षणात सुवर्ण पदकासह ती बंगळुरू येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे अभियंता म्हणून रुजू झाली. येथे रुजू होताच चांद्रयान -२ मोहिमेतही तिने आपले योगदान दिले होते. यानंतर चांद्रयान-३ मध्येही तिचा सक्रिय सहभाग आहे. आता तर नंतरच्या संशोधनाची जबाबदारी तिच्या चमूवर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com