patur in akola district.jpg
patur in akola district.jpg

सातमाळा पर्वतरांगानी या शहराला लाभली ऐतिहासिक पार्श्वभूमी अन् आता नैसर्गिक सौंदर्य...

पातूर (जि.अकोला) : तिन्ही बाजूंनी सातमाळा पर्वतरांगानी वेढा दिलेल्या पातूर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. पावसाळ्यात तर पातूरच्या निसर्ग सौंदर्याचा आंनद अवर्णनीय असतो. धोधानीचा धबधबा, माळराजूरा निसर्ग पर्यटन केंद्र, पातूर तलाव, मोर्णा धरण पाहन्यासाठी पर्यटक गर्दी करतात, सध्या कोरोनाच्या भीतीमुळे माणूस घरात बसलेला आहे. परंतु पातूर मधील निसर्ग सौंदर्याने मात्र कात टाकलेली आहे.

पातूर मधील जवळपासच्या डोंगराळ भागात अनेक लहानमोठ्या तलावात मुबलक पाणी उपलब्ध असून त्या परिसरातील उंच टेकड्या, दाट वनराई व दलदलीच्या भागात अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी वास्तव्य करतात. सध्याच्या परिस्थितीत या पक्षांचा मधुर आवाज गावापर्यंत पोचत आहे. अगोदर तुरळक स्वरूपात आढळून येणारे अनेक पक्षी आता पातूरमध्ये मुबलक प्रमाणात दिसत आहेत. 

यामध्ये दयाळ, साळुंक्या, सुर्यपक्षी, खंड्या, बुलबुल,कबुतरे आपल्या आवाजाने वातावरणात संगीत निर्माण करत आहेत. तर पातूर मधील अनेक लहान तलाव परिसरात मोठ्या आकाराचे दुर्मिळ व स्थलांतरित काळे पांढरे व निळे पट्टे असलेले बदक, केशरी व पांढरे पट्टे असलेले ब्राम्हीनी बदकचे अनेक प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे बगळे, भारद्वाज, हळद्या, व याशिवाय अनेक प्रकारचे पक्षी मुक्तपणे संचार करताना दिसतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे सोबतच मुबलक पाणी व घटते प्रदूषणामुळे पक्षाच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे. तसेच त्यांच्या मधुर संगीताने वातावरणात एक सुखद गारवा निर्माण झाल्याचे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com