नागपूरच्या मध्यभागी सापडला ऐतिहासिक खजिना... बघाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019


- कस्तुरचंद पार्कच्या खोदकामात सापडल्या 200 वर्षे जुन्या तोफा

नागपूर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कस्तुरचंद पार्क येथे सुमारे दोनशे वर्षे जुन्या चार तोफा सापडल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील कस्तुरचंद पार्कचे सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. बुधवारी (ता. 16) रात्री खोदकाम सुरू असताना ऐतिहासिक तोफा आढळून आल्या. सध्या या चारही तोफा लष्कराने स्वत:च्या ताब्यात घेतल्या असून, पुरातत्व विभागाने संशोधनाची पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
खोदकामादरम्यान सापडलेल्या या सर्व तोफा मराठा साम्राज्यातल्या असल्याची शक्‍यता असल्याचे मत प्रसिद्ध इतिहास संशोधक भा. रा. अंधारे यांनी व्यक्‍त केली आहे. या तोफा दुसरे रघुजी महाराज भोसले यांच्या काळातील असून, 1813 ते 1818 च्या दरम्यान झालेल्या युद्धात यांचा वापर झाला असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे. संपूर्ण कस्तुरचंद पार्कचे उत्खनन केल्यास सुमारे तीसहून अधिक तोफा सापडतील असा अंदाज राजे मुधोजी भोसले यांनी व्यक्‍त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Historical treasures found in the center of Nagpur.