esakal | भारतीयांनी विदेशातही जपली होळीची परंपरा!
sakal

बोलून बातमी शोधा

Holi tradition celebrated by Indians abroad!

भारतीचा संस्कृतीचा वारसा हा आपल्या सणांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे जपला आहे. तसेच विदेशात गेलेल्या भारतीयांनी सुद्धा हा वारसा कायम ठेवला आहे. त्यामुळेच अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांनी आज (ता.9) विधीवत पूजन करून होळीचे दहन केले. अशी माहिती शेलुबाजार येथील नितीन शालीग्राम घोडे यांनी अमेरिकेतून दिली आहे.

भारतीयांनी विदेशातही जपली होळीची परंपरा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेलुबाजार (जि.वाशीम) : भारतीचा संस्कृतीचा वारसा हा आपल्या सणांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे जपला आहे. तसेच विदेशात गेलेल्या भारतीयांनी सुद्धा हा वारसा कायम ठेवला आहे. त्यामुळेच अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांनी आज (ता.9) विधीवत पूजन करून होळीचे दहन केले. अशी माहिती शेलुबाजार येथील नितीन शालीग्राम घोडे यांनी अमेरिकेतून दिली आहे.


भारतीय संस्कृतीला अनेक सणांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यात भारतातील अनेक भाषा, जाती, समुदाय, वेगवेगळ्या परंपरांचा पूर्वापार चालत आलेल्या आहेत. भारतात सणांच्या माध्यमातून जो सांस्कृतिक वारसा जपला जातो, तो आज विदेशातही भारतीयांनी जपला आहे. शेलुबाजार येथील रहिवासी व नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेतील अटलांटा शहरात परीवारासह वास्तव्यास असलेले नितीन घोडे हे भारतीयांच्या उत्सवात सहभागी होतात. होळीच्या निमित्ताने आज (ता.9) अटलांटा येथील राम मंदिर परिसरात होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता तेथील रहिवासी असलेल्या भारतीयांनी राममंदिर परीसरात उपस्थित राहून विधीवत पूजाअर्चा करून होळीचे दहन केले. या होळीच्या निमित्ताने मोठ्या मंडळीसह लहानग्यांनीही होळीचा उत्सव अमेरीकेत अनुभवला.