esakal | विदर्भातील शाळांना २८ जूनपर्यंत सुटी

बोलून बातमी शोधा

विदर्भातील शाळांना २८ जूनपर्यंत सुटी
विदर्भातील शाळांना २८ जूनपर्यंत सुटी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शिक्षण बंद असले तरी ऑनलाइन शिक्षण सुरू होते. आता १ मेपासून विदर्भातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होणार आहे. त्यावेळची परिस्थिती व शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे फेब्रुवारी २०२० पासून शाळा बंद आहेत. त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्ष विद्यार्थी घरी बसूनच अभ्यास करीत होते. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर मधल्या काळात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याने वर्ग बंद करून परीक्षा रद्द करण्याची वेळ आली.

आता राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १ मेपासून सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात १४ जूनपर्यंत सुटी आहे. विदर्भातील उन्हाची तीव्रता बघता दरवर्षीप्रमाणे २८ जून २०२१ पासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होईल. त्यावेळची कोरोना संसर्गाची परिस्थिती बघून शाळा सुरू करण्याचाबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

संपादन - विवेक मेतकर