अबे, मंगळवारपासून श्रावण लागते ना, मंग मारनं ताव चिकन-मटणावर... 

संतोष तापकिरे
Monday, 20 July 2020

रविवारी बहुतेक चाकरनाम्यांना आणि काही मोठ्या व्यापाऱ्यांना सुटी असते. त्यामुळे या दिवशी खासकरून अनेकजण झणझणीत चिकन किंवा मटणाच्या भाजीला पसंती देतात. त्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस स्थानिक प्रशासनातर्फे जनता कर्फ्यूसुद्धा जाहीर करण्यात आला.

अमरावती  : मंगळवार, 21 जुलैपासून महाराष्ट्रीय लोकांसाठी सर्वात महत्त्वाचा असलेला श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात सर्वाधिक मराठी सण येत असल्याने हा महिना खूप पवित्र मानला जातो. त्याचमुळे खासकरून या पूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज्य केला जातो. आता आपल्याला कमीत कमी महिनाभर तरी आवडीची चिकन बिर्याणी, चिकन, मटण आणि मच्छी खाता येणार नाही म्हणून बहुतेकांनी रविवारी (ता.19) जनता कर्फ्यू असतानासुद्धा चोरून-लपून शहराच्या काही भागांत मांस खरेदीसाठी गर्दी केली, तर काही ठिकाणी मांस विक्रेत्यांनी पार्सल सुविधा उपलब्ध करून दिली होती. 

अवश्य वाचा- `तो` देखणा तर `ती` सौंदर्यवान, आले आज सर्वाधिक जवळ...

रविवारी बहुतेक चाकरनाम्यांना आणि काही मोठ्या व्यापाऱ्यांना सुटी असते. त्यामुळे या दिवशी खासकरून अनेकजण झणझणीत चिकन किंवा मटणाच्या भाजीला पसंती देतात. त्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस स्थानिक प्रशासनातर्फे जनता कर्फ्यूसुद्धा जाहीर करण्यात आला. दोन दिवसांवर श्रावण येऊन ठेपलेला आणि त्यात जनता कर्फ्यू. मगकाय, सर्वजण घरीच असल्याने बहुतेक मांसाहारी खवय्ये रविवारी मांस विक्रीच्या दुकानांवर जणू तुटून पडले. 

अवश्य वाचा- एकतर्फी प्रेमाची गाडी पुढे सरकलीच नाही, आता पोलिस त्याच्या शोधात

जनता कर्फ्यूमुळे चपराशी पुरा, जेलक्वॉर्टर, यशोदानगर, शिवाजीनगर भागातील मांस विक्रीची बरीच दुकाने बंद होती. मात्र, जुन्या अमरावतीसह अनेक ठिकाणी मांसविक्रीची दुकाने सुरू होती. काही ठिकाणी खवय्ये पिशव्या घेऊन उभे होते. चपराशीपुरा, यशोदानगरसह बऱ्याच भागात असे चित्र बघायला मिळाले. अशा ग्राहकांजवळ मांसविक्रेत्यांचे प्रतिनिधी येऊन त्यांची मागणी नोंदवीत होते. नोंदविलेल्या मागणीनुसार त्या ग्राहकांपर्यंत चिकन-मटणाचे पार्सल पोहोचवून दिले जात होते. जनता कर्फ्यू असल्याने पोलिस व महापालिका प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी आडोशाला मांस कापून पार्सलची सेवा या व्यावसायिकांनी सुरू ठेवली होती. 
संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Holy Marathi month Shrawan is begining from Tuesday. So many people gave preference to eat nonveg on sunday ...