`तो` देखणा तर `ती` सौंदर्यवान येणार आज सर्वाधिक जवळ... 

सुधीर भारती
Monday, 20 July 2020

प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी आणि शनी हे अंतर सरासरी कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुंदर रिंग चांगल्या प्रकारे दिसू शकते. ही रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. 20 जुलैला या दोन ग्रहांमधील अंतर 134 कोटी 60 लक्ष किलोमीटर राहील.

अमरावती : सूर्यमालेतील सर्वांत सुंदर व विलोभनीय रिंग असणारा शनी ग्रह सोमवारी, 20 जुलै रोजी पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात "प्रतियुती' असे म्हणतात. 

प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी आणि शनी हे अंतर सरासरी कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुंदर रिंग चांगल्या प्रकारे दिसू शकते. ही रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. 20 जुलैला या दोन ग्रहांमधील अंतर 134 कोटी 60 लक्ष किलोमीटर राहील. या आधी 9 जुलै 2019 रोजी शनी-सूर्य प्रतियुती झाली होती. शनीला एकूण 82 चंद्र असून सर्वांत मोठा चंद्र टायटन आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास 29.5 वर्ष लागतात. ग्रहाचा व्यास 1 लाख 20 हजार किलोमीटर आहे. तापमान शून्याकाळी 180 अंश सेंटीग्रेड आहे. या ग्रहाची घनता सर्वांत कमी आहे.

अवश्य वाचा- एकतर्फी प्रेमाची गाडी पुढे सरकलीच नाही; आता पोलिस त्याच्या शोधात

शनीची रिंग 2 लाख 70 हजार किमीपर्यंत पसरलेली आहे. ही रिंग बर्फाची असून शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट आहे. 20 जुलैला सूर्य मावळल्यानंतर लगेच शनी ग्रह पूर्व क्षीतिजावर उगवेल व पहाटे पश्‍चिम क्षीतिजावर मावळेल. हा ग्रह रात्रभर आकाशामध्ये दिसेल. हा ग्रह काळसर व पिंगट रंगाचा चमकदार दिसेल. त्यामुळे सहज ओळखता येईल. मात्र, या ग्रहाची रिंग साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही.

अवश्य वाचा- कोविड कक्षात जायची वेळ येऊ देऊ नका, अन्यथा जेवणात मिळेल गोम.... 

हा ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने या ग्रहाचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The most beautiful planet in the solar system will come closest to Earth on Monday