घरभाड्याचा वाद : तीन भाडेकरूंनी केला घरमालकाचा खून

File photo
File photo

नागपूर : घरभाड्याचे पैसे देण्याच्या वादातून तीन भाडेकरूंनी घरमालाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. ही थरारक घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कळमन्यात घडली. रामलाल दद्दीप्रसाद जयस्वाल (वय 41, रा. रिवा-मध्यप्रदेश) असे मृत घरमालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलाल जयस्वाल हे मूळचे मध्यप्रदेशातील रिवा येथील आहेत. काही वर्षांपूर्वी ते व्यवसायानिमित्त नागपुरात आले. व्यवसायातू पैसा कमविल्यानंतर त्यांनी कळमन्यातील आदर्श नगरात मोठे घर बांधले. काही वर्षे पत्नी व मुलांसह राहिल्यानंतर ते रिवा येथे कुटुंबासह निघून गेले. तत्पूर्वी त्यांनी आदर्श नगरातील घरात भाडेकरू ठेवले. दोन खोल्या आरोपी अंकुश जयस्वाल आणि त्याच्या मित्रांना भाड्याने दिल्या होत्या. रामलाल हे घराचे भाडे वसूल करण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नागपुरात येत होते. तसेच एका रुग्णालयात उपचार देखील घेत होते. गेल्या 11 सप्टेंबरला ते नागपुरात आले होते. रुग्णालयाचे काम आटोपून त्यांनी भाडेकरूंना पैसे मागितले होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता ते अंकूश जयस्वाल याच्याकडे गेले. त्याने जवळपास तीन महिन्यांचे भाडे थकवले होते. या महिन्याचेही भाडे देण्यासाठी तो कुरबूर करीत होता. भाडे मिळणार नसल्याने त्यांनी अंकूशला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. त्यावरून रामलाल आणि अंकूशमध्ये वाद झाला. वादातून अंकूशने रामलाल यांच्यावर अचानक हल्ला केला. त्याच्या साथिदारांनी रामलाल यांना पकडून ठेवले तर अंकूशने रामलाल यांच्या डोक्‍यात मोठा दगड घातला. या हल्ल्यात रामलालचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी लगेच घरातून कपडे आणि पैसे घेऊन पळ काढला. ही घटना उघडकीस आल्यानंतर कळमना पोलिस घटनास्थळावर पोहचले. त्यांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com