होमगार्ड मृत्यूप्रकरण पोलिसांवर उलटले?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

अमरावती : सिलिंडर चोरीचा आरोप ठेवल्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यातच पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळेच होमगार्डचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यामुळे दोषींवर गुन्हे दाखल करेपर्यंत मृतदेह न उचलण्याची धमकी नातेवाइकांनी बुधवारी (ता. 21) दिल्यानंतर राडा झाला.

अमरावती : सिलिंडर चोरीचा आरोप ठेवल्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यातच पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळेच होमगार्डचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यामुळे दोषींवर गुन्हे दाखल करेपर्यंत मृतदेह न उचलण्याची धमकी नातेवाइकांनी बुधवारी (ता. 21) दिल्यानंतर राडा झाला.
भीम आर्मीसह बसपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीची आई, पत्नी, मुलांसह पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यामुळे दुपारी अडीच वाजेपर्यंत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. राजू बापूराव वानखडे (वय 35, रा. टाटानगर, दर्यापूर) असे मृत होमगार्डचे नाव असून तो दर्यापूर ठाण्यांतर्गत हंगामी ड्युटीवर होता. राजू वानखडे याची घरी असताना प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून अमरावतीच्या इर्विनमध्ये मंगळवारी दाखल केले. उपचारादरम्यान सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करताना राजूला जबर मारहाण केली. तशाप्रकारच्या जखमा त्याच्या शरीरावर होत्या. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत्यूस जबाबदार दर्यापूर पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाइकांसह सोबत असलेल्या समर्थकांनी बुधवारी (ता.21) पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली.
होमगार्ड राजू वानखडे यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी एसडीपीओंकडे सोपवली असून, पीएम रिपोर्टसह चौकशी अहवालाच्या आधारे कुणी दोषी आढळल्यास कारवाई होईल. तूर्तास दर्यापूर ठाणेदार दीपक वानखडेसह दोन पोलिस कर्मचारी, अशा तिघांना मुख्यालयी अटॅच केले आहे.
-डॉ. हरिबालाजी एन.
पोलिस अधीक्षक, अमरावती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homeguard overturned on death penalty police?