होमगार्ड राहणार मतदानापासून वंचित 

file photo
file photo

नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना कायदा व सुव्यवस्थेच्या कर्तव्यावर तैनात असलेले होमगार्ड, जवान मतदानाचा हक्क बजाऊ शकणार नाही. पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात 1340 पुरुष व महिला होमगार्ड निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. 
विधानसभा निवडणुकीत सहभागी झालेल्या होमगार्डसह सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रक्रिया राबविण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात पोस्ट बॅलेट सिस्टीम ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह सर्वांनाच प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, विधानसभा निवडणूक प्रक्रियेत निवडणूकविषयक कामकाजात असणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी इलेक्‍शन ड्यूटी सर्टिफिकेट (ईडीसी) किंवा पोस्टल बॅलेट या सुविधा दिल्या होत्या. पोलिस प्रशासनाने होमगार्ड जवानांकडून अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया केलेली नाही. तसेच होमगार्डकडून पोस्टल बॅलेटसाठी अर्जच पोलिस विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवून घेतले नसल्याची माहिती पुढे आली. राष्ट्रीय कर्तव्यावर तैनात असताना होमगार्डला नियुक्तीचे केंद्र सोडता येणार नाही. तसे केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे होमगार्ड मतदानापासून वंचित राहणार आहे. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चार राज्यांतील होमगार्ड राज्यात आले आहेत. असे असताना राज्यातील होमगार्ड मतदानापासून वंचित राहणार असल्याने अनेक होमगार्ड जवानांनी नाराजी व्यक्त केली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com