घरकुलांची किंमत बाजारमूल्यांपेक्षाही अधिक

File photo
File photo

अमरावती : सर्वांना परवडणारी घरे देणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसऱ्या घटकातील घरांचे बांधकाम दर न परवडणारे असे आहेत. या घटकातील लाभार्थींना प्रती चौरस 3,290 रुपये दर आकारण्यात येत असून बाजारमूल्यांपेक्षा ते 800 ते 900 रुपयांनी अधिक आहेत. त्यामुळे शासनाच्या या महत्त्वकांक्षी योजनेतील घरे परवडणारी आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
महापालिकेच्या आमसभेत हा प्रश्‍न भाजपचे सदस्य अजय गोंडाणे यांनी उपस्थित केला. प्रधानमंत्री आवास योजनेतील घटक तीनमधील लाभार्थींच्या घरकुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. येत्या 23 व 24 ऑगस्टला सोडत ठेवण्यात आली आहे. त्या आनुषंगाने प्रशासनाने आमसभेत घरकुलांची विक्री किंमत निश्‍चित करण्याबाबत प्रशासकीय प्रस्ताव मंजुरीकरिता मांडला होता. मौजा म्हसला येथे मनपाच्या जागेवर 54 सदनिका बांधण्यात येत असून प्रती सदनिकेची किंमत 9 लाख 48 हजार रुपये निर्धारित करण्यात आली आहे. 30 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या सदनिकेच्या बांधकामाचा दर 2,390 रुपये प्रति चौरस फूट निश्‍चित करण्यात आला आहे. जागेची किंमत, त्यावरील विविध कर व शुल्कासह बांधकाम खर्च मोजल्यास लाभार्थीला प्रती चौरस मीटर 31,591 रुपये मोजावे लागणार आहे.
लाभार्थींना आकारण्यात येणाऱ्या बांधकाम दरावर सदस्यांनी आक्षेप घेतलेत. बाजारात बांधकामाचे महत्तम दर 1,500 रुपये प्रती चौरस फुटापेक्षा अधिक नसताना महापालिकेने या योजनेत 2,390 रुपये दर कसा आकारला हा प्रश्‍न सर्वानांच बुचकळ्यात टाकणारा ठरला आहे. प्रशासनाकडून आयुक्त संजय निपाणे व या योजनेचे समन्वयक चौधरी यांनी सदस्यांचे समाधान करण्याचा बराच प्रयत्न केला; मात्र सदस्यांचे समाधान होऊ शकले नाही. अखेर महापौरांच्या कक्षात बैठक घेऊन शंकांचे निरसण करण्यात येईल, असा तोडगा काढण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com