भाजपमध्ये ‘होर्डिंग वॉर’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

नागपूर - भाजपचे नगरसेवक आणि महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये होर्डिंग वॉर सुरू आहे. एकमेकांचे होर्डिंग अनधिकृत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे केल्या जात आहेत. यामुळे हा वाद महापौरांच्या दरबारात पोहचला असून, त्यांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते.  

नागपूर - भाजपचे नगरसेवक आणि महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये होर्डिंग वॉर सुरू आहे. एकमेकांचे होर्डिंग अनधिकृत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे केल्या जात आहेत. यामुळे हा वाद महापौरांच्या दरबारात पोहचला असून, त्यांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते.  

केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही सत्ता असल्याने भाजपात निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली. प्रत्येक जण उमेदवारीसाठी धडपडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यंदा शंभर नगरसेवक निवडूण आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदाची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत दोन्ही नेत्यांनी महापालिका गमवायची नाही. यामुळे उमेदवारांना सर्वच प्रकाराची रसद पोचविली जाणार आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनाच निवडूण येण्याची खात्री वाटत आहे. यामुळे अनेक वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्यांना बसवा आणि नव्यांना संधी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांमार्फत होत आहे. प्रत्येक जण आपला ठसा उमटवण्यासाठी गल्लोगल्लीत पोस्टर लावत आहे. ही बाब अनेक विद्यमान नगरसेवकांना खटकत आहे. ते अनधिकृत होर्डिंग काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देत आहे. याची तक्रार कार्यकर्त्यांनी महापौरांकडे केली. त्यांनी कार्यकर्त्यांच्या होर्डिंगला धक्का लावू नका, अशा सूचना दिल्याने अधिकारी पेचात सापडले आहेत. 

कार्यकर्त्यांचे नेत्यांना प्रश्‍न
काँग्रेसमधील अंतर्गत भांडणाला कंटाळून आणि महापालिकेत दहा वर्षांपासून सत्ता असल्याने अनेक कार्यकर्त्यांनी हातात कमळ धरले. यामुळे निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते चिडले आहेत. सत्ता यांनी उपभोगायची आणि आम्ही सतरंज्या उचालायच्या का? असा प्रश्‍न कार्यकर्ते नेत्यांकडे उपस्थित करीत आहेत.

Web Title: hording war in bjp