दीड वर्षापासून मानधनच नाही, सांगा आम्ही जगायचं कसं? अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचा ठिय्या

क्रिष्णा लोखंडे
Tuesday, 29 September 2020

मार्च 2019 पासून सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेले नाही. तसेच कोरोनाच्या काळात परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. मानधन मिळत नसल्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न सर्व कर्मचाऱ्यांसमोर उभा आहे.

अमरावती : अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या कार्यालयासमोर झोपा आंदोलनास सुरुवात केली आहे. मागण्या पूर्ण होईस्तोवर आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेने दिला आहे.

हेही वाचा - खास वऱ्हाडी चमचमीत पाटोडीचा रस्सा

मार्च 2019 पासून सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेले नाही. तसेच कोरोनाच्या काळात परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. मानधन मिळत नसल्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न सर्व कर्मचाऱ्यांसमोर उभा आहे. २०१९ पासूनच अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी आहे. त्यासाठी वारंवार आंदोलने केली. सरकारला निवेदने दिलीत. मात्र, काहीही एक फरक पडला. 

हेही वाचा - हिरव्या आणि काळ्या रंगाचे तांदूळ बघितले आहेत? आरोग्यासाठी आहेत अतिशय गुणकारी; प्राध्यापकाने केला...

शासकीय वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. मात्र, आम्हाला मानधन दिले जाते. त्यातही मार्च २०१९ पासून मानधन मिळाले नाही. त्यासाठी त्यांनी 12 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, सामाजिक न्याय विभागीय प्रादेशिक उपायुक्तांनी त्यांना मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे उपोषण स्थगित करून मागे घेतले होते. बराच कालावधी उलटल्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्याने आता समाजकल्याण विभागाच्या कार्यालयासमोर झोपा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सुभाष सोनारे, श्रीकृष्ण सगणे, सुनील बोधनकर, प्रशांत ढेंगे, रामबुद्धी हरसुले, संजय धंदर, मुन्नू सावरकर, सविता अवघड, कलावती ढगे, मालिनी सगणे, चंद्रकला येवले, सुनील येवले, अलका ठाकरे, नीलेश सहारे, पद्‌माकर शिवरकर व दिलीप मौने यांनी सहभाग घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hostel employees agitation for honorarium in amravati