झोपेतच घराला आग लागली अन् सर्वच संपलं, मुलाच्या उपचाराचे पैसेही जळाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bondre Family

झोपेतच घराला आग लागली अन् सर्वच संपलं, मुलाच्या उपचाराचे पैसेही जळाले

निलज बु. (जि. भंडारा) : मुलाला घशाचा आजार...घरची परिस्थिती अत्यंत वाईट. त्यामुळे नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले. पण, गाढ झोपेत असताना घराला आग लागली अन् सर्वच संपलं. घरातील अन्न-धान्यासह सर्व जळून खाक झालंय. मुलाच्या उपचाराचे पैसेही जळाले. ही घटना आहे मोहाडी (Mohadi Bhandara) तालुक्यातील करडी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या नरसिंह टोला गावातील.

हेही वाचा: मित्राच्या पत्नीवरच वारंवार बलात्कार, पतीला सोडण्यासाठी तगादा

नरसिंह टोला येथील रहिवासी गवतु बोंद्रे हे त्यांच्या परिवारातील अन्य पाच सदस्यांसह त्यांच्या मातीच्या घरात राहत होते. रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेवण करून घरातील सर्व सदस्य झोपी गेली. मध्यरात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घरात कसलातरी जळण्याचा वास येत असल्याकारणाने त्यांना जाग आली. सर्व जण दचकून जागे झाले आणि आतील खोलीचा दार उघडून बघतात तर काय...! घरात अग्नितांडाव सुरू होते. सर्वांनी आरडाओरडा सुरू केला. शेजारी जागे झाले आणि मदतीला धावून आले. हळूहळू गावातील अन्य लोकही घटनास्थळी मदत कार्याला हातभार लावू लागले. पाण्याच्या पंपाच्या सहाय्याने आग विझवण्याचा काम सुरू झाले. घटनास्थळी लगेच गावातील सरपंच व उपसरपंच भाऊराव लाडे यांनी धाव घेतली. सकाळी आग शांत झाल्यानंतर गावकऱ्यांनी घराची पाहणी केली तर गळसरी व घरातील सोन्याची लहान-मोठी दागिने आगीत वितळून गेली होती. त्यासोबतच जीवनावश्यक वस्तू, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे, कपड्यांची आलमारी, ५० हजार रुपये, घरगुती वापरण्याची किरकोळ साहित्य यांसह भांडी यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा पूर्वानुमान वर्तविण्यात येत आहे. या अग्नितांडवत कुठलीही जीवित हानी झाली नाही.

मुलाच्या उपचाराचे पैसे जळले -

गवतु बोन्द्रे यांच्या मुलाच्या घशाच्या आजाराच्या उपचारासाठी व औषधोपचारासाठी त्यांनी त्यांच्या नातलगांकडून ५० हजार रुपये उसने मागितले होते. परंतु, मंगळवारी साडेअकरा वाजताच्या सुमारास घराला लागलेल्या आगीत त्यांचे मोठे नुकसान झाले.

loading image
go to top