महिनाभराच्या नवजात शिशूला कसे मिळाले जीवनदान?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र


नागपूर ः महिनाभराचं वय असलेल्या नवजात शिशूच्या हृदयाची धडधड अनियमित होती. याचा हृदयासह इतर अवयवांना रक्त पोहोचण्यात अडचण येत असल्याचे निदानातून पुढे आले. मात्र, कार्डियाक इंटरव्हेंशनद्वारे रक्तप्रवाह सुरळीत करण्याची प्रक्रिया केली आणि चिमुकल्याचे हृदय पुरेशा प्रमाणात पंप करू लागले. नवजात शिशूचा जीव वाचवण्यात ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथील डॉक्‍टरांना यश आले.

मध्य प्रदेशातील बिरसिंहपूर, सतना येथील कुटुंब. महिनाभरापूर्वी झालेल्या प्रसूतीनंतर काही दिवस नवजात शिशू सामान्य होते असे प्रसूत मातेचे म्हणणे होते. परंतु, अचानक या शिशूला श्‍वास घेणे कठीण झाले. चिमुकल्याची नखं निळसर होत असल्याचे पालकांच्या लक्षात आले. काही दिवसांनंतर, शिशू आजारी पडले. आईचे दूध त्याला पिता येत नसल्यामुळे अखेर सतना येथील खासगी दवाखान्यात नेले. परंतु, त्यांनी ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रेफर केले. लगेच ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील कॅज्युअल्टी कॉम्प्लेक्‍सच्या चिमुकल्यांच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

रवी नायर हॉस्पिटल अँड प्रायव्हेट लिमिटेडचे युनिट असलेल्या ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये 28 ऑक्‍टोबरला अडीच हजार ग्रॅम वजनाच्या नवजात शिशूवर येथील कॅथ लॅबमध्ये "बलून एट्रियल सेप्टोस्टोमी ऍक्‍सेस' डॉ. कुलदीप सुखदेवे यांनी केले. डॉ. प्रमोद आंबटकर यांनी यशस्वीरित्या बीएएस केले. वरिष्ठ बालरोग व नवजात शिशूरोगतज्ज्ञ डॉ. कुलदीप सुखदेवे, नवजात शिशू ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद आंबटकर यांच्या निरीक्षणात सध्या ठेवण्यात आले आहे. रवी नायर हॉस्पिटल अँड प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापनाचे अध्यक्ष उदयभास्कर नायर, संचालिका डॉ. उषा नायर, डॉ. विद्या नायर तसेच डॉ. विनया नायर यांनी ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या पेडियाट्रिक्‍स आणि न्यूनॅटोलॉजी पथकाचे तसेच जोखमीच्या जीवनरक्षक प्रणालीतून चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या डॉक्‍टरांचे अभिनंदन केले.

आपल्याकडे डी-टीजीए आणि इंटॅक्‍ट वेंट्रीक्‍युलर सेप्टम असलेल्या बहुतांश रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. वैद्यकीय सुविधांअभावी गावखेड्यातील रुग्णांना योग्य उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. हा उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकावर रुग्णाच्या नातेवाइकांचा विश्‍वास बसला. यामुळेच जोखमीची शस्त्रक्रिया करण्यास बळ मिळते. चिमुकल्याचा जीव वाचवण्यात यश आले.
- डॉ. अनुप मरार, संचालक, ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com