व्याघ्र प्रकल्पासाठी आणखी किती पुरावे हवे? वाढतेय संख्या

व्याघ्र प्रकल्पासाठी आणखी किती पुरावे हवे? वाढतेय संख्या

यवतमाळ : जिल्ह्यातील घाटंजी आणि केळापूर तालुक्यात टिपेश्वर अभयारण्य (Tipeshwar Sanctuary in Ghatanji and Kelapur talukas) आहे. कन्याकुमारी ते काश्मीर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या अभयारण्यात वाघांच्या अधिकृत संख्येपेक्षा अभयारण्याच्या बाहेरही वाघांची संख्या मोठी आहे. परिसरात एकूण ६५ च्या वर वाघांचा अधिवास असल्याचे अभ्यासक सांगतात. त्यामुळे स्थानिकांना जीव मुठीत घेऊनच वावरावे लागते. हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने दिवसेंदिवस पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वाढतोय (The number of tourists increased). वाघांचे प्रजनन, संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने हा प्रदेश योग्यच असल्याने दिवसागणिक वाघांची संख्या वाढती आहे. या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळावा (The sanctuary should get the status of a tiger project), अशी वन्यजीवप्रेमींची मागणी आहे. व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळून लगतच्या गावातही समृद्धी नांदेल. परंतु, व्याघ्र प्रकल्प होताना स्थानिकांच्या समस्याही प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. (How much more evidence is needed for the Tiger Project?)

टिपेश्वर अभयारण्याच्या गेटवर शिवाजीराव मोघे महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागप्रमुख असणारे तथा शासनाचे मानद जीवरक्षक म्हणन काम पाहणारे प्रा. डॉ. रमझान विराणी यांची भेट झाली. एक वन्यप्रेमी म्हणून ते टिपेश्वर अभयारण्यावर सतत अभ्यास करीत असतात. डॉ. विराणी यांच्यासोबत अभयारण्यातील जैवविविधतेबद्दल चर्चा केली. १९९७ साली शासनाने टिपेश्वर अभयारण्य म्हणून घोषित केले.

व्याघ्र प्रकल्पासाठी आणखी किती पुरावे हवे? वाढतेय संख्या
भाजप-काँग्रेसमध्ये वाद; बोलू दिले जात नसल्याने आमदारांमध्ये वादावादी

टिपेश्वर अभयारण्यात टिपेश्वर व मारेगाव ही गावे वसलेली होती. या गावातील लोकांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न अभयारण्य घोषित झाल्याने निर्माण झाला होता. तो पुढे शासनाने सोडवला. वन्यजीव संरक्षण, संवर्धनासाठी टिपेश्वर अभयारण्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. गावांच्या पुनर्वसनानंतर वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जगाच्या नकाशावर ‘वाघांचा प्रांत’ अशी टिपेश्वरची ओळख आहे.

तब्बल ६५ वर वाघांचा अधिवास

अभयारण्य परिसरातील आदिवासी नागरिकांच्या पुनर्वसनासाठी तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे तत्कालीन मंत्री नीलेश देशमुख पारवेकर यांनी पाठपुरावा केला. नीलेश पारवेकर यांनी आदिवासी लोकांचे पुनर्वसन केल्यानेच अभयारण्यात वाघांची संख्या वाढल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. टिपेश्वर अभयारण्य वाघाच्या प्रजननासाठी सुरक्षित आणि संवर्धनासाठी अतिउत्तम आहे. या अभयारण्यात सध्या २५ नरमादी वाघ आहेत. वन्यजीव प्रेमींच्या मते, अभयारण्याच्या बाहेरच्या परिसरात जवळपास ४० वाघ असावेत. त्यामुळे जवळपास ६५ वर वाघ परिसरात आहेत. वाघांची एवढी मोठी संख्या असताना टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा अद्याप प्राप्त झालेला नाही.

व्याघ्र प्रकल्पासाठी आणखी किती पुरावे हवे? वाढतेय संख्या
‘आई, मी तुझी सेवा करायला येत आहे!’ मुलाने केली आत्महत्या

टिपेश्वर, पैनगंगा एकत्रीकरणाचा प्रस्ताव

टिपेश्वर अभयारण्य पर्यावरण, वातावरण आणि पाणलोट क्षेत्रासाठी उत्तम आहे. तसेच जैविक, भौगोलिकदृष्ट्या संपन्न असलेल्या या अभयारण्यात १४९.६८ चौरस किलोमीटर कोर एरिया आहे. तर त्यात बफर झोन म्हणून ४०४.५७ चौरस किलोमीटर असे मिळून व्याघ्र प्रकल्पासाठी एकूण क्षेत्र ५५४.२५ चौरस किलोमीटर प्रस्तावित करण्यात आले आहे. टिपेश्वर व पैनगंगा मिळून व्याघ्र प्रकल्प करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. टिपेश्वरमध्ये पट्टेदार वाघांची संख्या वाढत असल्याने टिपेश्वरमधील वाघ ताडोबा व तेलंगणातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मुक्तपणे फिरताना दिसतात. टिपेश्वरमधील वाघांना क्षेत्र कमी पडत असल्याने व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली जात आहे.

टिपेश्वर अभयारण्यातील वाघ पैनगंगा अभयारण्यात स्थलांतरित होत आहेत. अशा परिस्थितीत टिपेश्वर व लगतच्या क्षेत्रांचा वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. यामध्ये स्थानिकांच्या सहभागाचे स्थान अनन्यसाधारण आहे. अशा क्षेत्रात जिथे वाघांचे वास्तव्य आहे त्या क्षेत्रातील स्थानिकांना निसर्ग पर्यटनासाठी प्रोत्साहित करून तिथे कम्युनिटी टूरिझमद्वारे रोजगार निर्मिती केल्यास सहभागातून संवर्धन संकल्पनेला मूर्त रूप प्राप्त होईल.
- प्रा. डॉ. रमझान विराणी, प्राणीशास्त्र प्रमुख, शिवाजीराव मोघे महाविद्यालय तथा मानद वन्यजीव रक्षक, पांढरकवडा
व्याघ्र प्रकल्पासाठी आणखी किती पुरावे हवे? वाढतेय संख्या
जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म
टिपेश्वर अभयारण्यात दिवसेंदिवस वाघांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अभयारण्यालगतच्या गावातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध झाला. टिपेश्वर व्याघ्र पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. वाघांना क्षेत्र कमी पडत असल्याने वाघ पैनगंगा व इतर क्षेत्रात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे टिपेश्वर, पैनगंगा अभयारण्य एकत्र करून व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केल्यास वन्यजीव संरक्षणासाठी मोठे क्षेत्र निर्माण होईल. बफर झोन क्षेत्रातसुद्धा स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
- प्रकाश महाजन, वन्यजीवप्रेमी, पांढरकवडा

(How much more evidence is needed for the Tiger Project?)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com