esakal | ‘आई, मी तुझी सेवा करायला येत आहे!’
sakal

बोलून बातमी शोधा

‘आई, मी तुझी सेवा करायला येत आहे!’ मुलाने केली आत्महत्या

‘आई, मी तुझी सेवा करायला येत आहे!’ मुलाने केली आत्महत्या

sakal_logo
By
विजय राऊत

नागपूर : तो अगदी वर्षभराचा असताना आईला पतीने सोडले. पतीपासून दूर झाल्यानंतर आईने त्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. काबाडकष्ट करून आईने प्रपंच चालविला. एकुलता एक जगण्याचा आधार म्हणून त्याला शिकविले. पुण्याला जाऊन त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मात्र, कोरोनाकाळात गावाला आईकडे आला असताना आईचा हृदयविकाराने मृत्यू (Mother dies of heart attack) झाला. हे दुःख पचविणे त्याला सहन झाले नाही. आता कुठे सुखाचे दिवस आले असताना आईच नसल्याची खंत मनात ठेवून त्याने रविवारी (ता. १३) गळफास लावून जगाचा निरोप (boy committed suicide) घेतला. एमआयडीसीतील साईनगर येथील ही घटना. रोशन सुनील जारोडे (वय २३) असे मृत युवकाचे नाव... (Son-commits-suicide-after-mother's-death)

रोशन याचे बीईपर्यंत शिक्षण झाले. त्याची आई मेस चालवून संसाराचा गाढा ओढायची. काबाडकष्ट केल्यानंतर पैपै शिल्लक पाडून दोन वर्षांपूर्वी साईनगरात घर घेतले. घरी दोन भाडेकरू आहेत. एक महिन्यापूर्वी कोरोनाकाळात हृदयविकाराने रोशनच्या आईचे निधन झाले. त्यामुळे तो नेहमीच तणावात राहायला लागला. चार दिवसांपूर्वी तो मामाकडे गेला. रविवारी दुपारी घरी परतला. त्याने काकालाही घरी परतल्याचे सांगितले.

हेही वाचा: जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म

सायंकाळी रोशन याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी रोशन याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘मला माझ्या आईची सेवा करायची आहे. मला आता जगणे शक्य नाही. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही. माझी मोटारसायकल नातेवाइकाला द्यावी’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून, एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली व तपास सुरू केला.

व्हॉट्सॲपवर ठेवला डीपी

मृत्यूपूर्वी तो अतिशय तणावाखाली होता. दुकानातून त्याने नायलॉनची दोर खरेदी केली. कोणीतरी त्याला विचारले की दोर कशासाठी खरेदी केली, यावर तो काहीच बोलला नाही. त्याने व्हॉट्सॲपवर आईचा फोटो व ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखारी’ said everyone in your life will have last day with you and yo don,t even know when it will be literally felt that असे मेसेज टाकले होते. मृत्यूपूर्वी त्याने आईच्या फोटोवर ताज्या फुलांचा हार चढविला होता.

हेही वाचा: दुर्दैवी! लहानग्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात बहीणही बुडाली

शंका कुशंका

रोशनला कोणीच नातेवाईक नाही, अशी त्याची आई नेहमीच म्हणत होती. नातेवाइकांपासून तिने स्वतःला फार दूर ठेवले होते, असे शेजारी सांगतात. रोशनने आत्महत्या केली यावर मात्र प्रश्‍नचिन्ह लावण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून मृत्युसमयी त्याचे दोन्ही हात पाठीमागे घट्ट बांधलेले होते, असे सांगण्यात येते. त्याने हात बांधून गळफास कसा घेतला, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

loading image