पाण्याचा खेळ कसा बेतला युवकाच्या जिवावर, वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

नागपूर ः पोहता येत नसतानाही पोहण्याचा मोह एका युवकाच्या जिवावर बेतला. पोहण्यासाठी तलावात उतरलेला युवक खोल पाण्यात गेला. मिनिटाभरातच तो गटांगळ्या खाऊ लागला. सोबत असलेल्या मित्रालाही पोहणे येत नव्हते. त्यामुळे युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सोनेगाव तलावात घडली. महेंद्रकुमार सुबेलाल बिलोने (22, रा. अनाथ आश्रम, सोनेगाव जुनी वस्ती) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रकुमार हा मूळचा बालाघाट येथील रहिवासी आहे. तो 5 ते 6 वर्षांपूर्वी कामाच्या शोधात नागपूरला आला होता. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता. कामावरून परतल्यानंतर तो आणि त्याचा मित्र सोनेगाव तलावात अंघोळीसाठी गेले. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे तलावाच्या खोल पाण्यात जायचे नाही, असे ठरले होते. दोघेही तलावाच्या काठावरच अंघोळ करीत होते. दरम्यान, अंघोळ झाल्याने महेंद्रकुमारचा मित्र तलावाच्या बाहेर आला. महेंद्रकुमारही बाहेर येणार होता. मात्र, अचानक त्याला आपल्याला पोहता येत असल्याचे दाखविण्याचा मोह आवरत आला नाही. त्यामुळे तो खोल पाण्यात गेला.

"वाचवा...बाहेर काढा'
खोलात जात असताना तो मित्राला व इतरांना "वाचवा...बाहेर काढा' अशी विनवणी करू लागला. ही बाब लक्षात येताच मित्र मदतीसाठी धावला. मात्र, त्यालाही पोहता येत नसल्याने तो महेंद्रपर्यंत पोहोचू शकला नाही. बघता-बघता त्याच्या मित्रासह इतरांच्या डोळ्यांसमोर महेंद्रकुमारचा जीव गेला. घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी तलावासमोर झाली होती. यातील नागरिकांनी सोनेगाव पोलिसांना सूचना दिली.

अकस्मात मृत्यूची नोंद
 पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. अग्निशमन विभागाच्या मदतीने महेंद्रकुमारचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी महेश रामचंद्र जेठानी (55, रा. सिंधी कॉलनी) यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिस हवालदार संजय चामटकर यांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how water game played death