इच्छाशक्तीने ‘हायपोटोनिक’वर मात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नागपूर - आठ महिन्यांचा असताना ‘एनेन्थेशिया’ चे प्रमाण जास्त दिल्याने अंजन ‘हायपोटोनिक’चा शिकार ठरला. शरीरातील नसांमधील ताकदच संपल्याने तो स्वत:च्या पायावरही उभा होईल, असे वाटत नव्हते. मात्र, आई-बाबा, आजी आणि आजोबांचे प्रयत्न आणि स्वत:च्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अंजन उधोजी हा ‘युनिक’ ठरला आहे. 

यशासाठी अंजनने स्वत:चा ‘युनिक स्टडी पॅटर्न’ विकसित केला आहे. अंजनच्या समुपदेशक डॉ. जया शिवलकर ‘गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड’ याची नोंद करणार असल्याचे सांगितले. बारावीत त्याने ८३ टक्‍के मिळविले आहेत.  अभ्यासात सामान्य वाटणारा अंजनचे अभ्यासाचे नोटबुक पाहिले की, विलक्षण बुद्धिमत्ता लक्षात येते.  ए, बी, सी ते झेड पर्यंत असलेले हे मुळाक्षरे अंजनच्या अभ्यासाचे साधन. एखादे वाक्‍य लक्षात ठेवायचे असेल तर त्या वाक्‍यातील प्रत्येक शब्दातील पहिल्या अक्षराचे मुळाक्षर क्रमाने लिहायचे आणि त्यातून एक वाक्‍यच नव्हे तर संपूर्ण अभ्यासक्रम लक्षात ठेवायचा. हा अंजनचा ‘स्टडी पॅटर्न’. अंजन हे सर्व अगदी तोंडपाठ सांगतो. विशेष म्हणजे, यासाठी तो पाठांतर  मुळीच करीत नाही. फक्त दोनदा तो  ‘पॅटर्न’ मधील अभ्यास वाचतो. रात्री झोपेत उठवून त्याला कुठलाही प्रश्‍न विचारला तरी तो अचूक उत्तर सांगतो.

अभ्यासासह मला क्रिकेट बॅडमिंटन खेळायला आवडते. शाळेपासून ते घरापर्यंत सर्वच मित्र माझे ‘बेस्ट’ आहेत. भविष्यात ‘सीए’ होण्याची इच्छा आहे. त्यासाठी बी.कॉमसाठी प्रवेश घेईन व सोबतच सीएची पण तयारी सुरू करणार आहे.
- अंजन उधोजी 

Web Title: HSC result declare anjan udhoji success