esakal | यवतमाळमध्ये भीषण पाणीटंचाई; शहराला पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा; नागरिकांमध्ये असंतोष

बोलून बातमी शोधा

null
यवतमाळमध्ये भीषण पाणीटंचाई; शहराला पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शहरात कोरोना (Corona) संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा (Water Crisis) करावी लागत आहे. शहरातील अनेक भागात पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा (Water Supply) होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष दिसून येत आहे. नगरसेवकांनीही पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत तक्रार केली आहे. (Huge Water crisis in Yavatmal getting water once in 15 days)

हेही वाचा: कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांसाठी तरुण बनला देवदूत; स्वतःच्या गाडीला रुग्णवाहिका बनवून दिवसरात्र सेवा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा तसेच चापडोह या दोन्ही प्रमाणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. असे असतानाही शहरातील अनेक भागात पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणी नसल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे सकाळी अकरानंतर संचारबंदी आहे. उन्हाचा तडाखा वाढला आहे.

अशातच पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. उन्हाळा सुरू होताच शहरात दरवर्षीच पाणीटंचाई डोके वर काढते. यंदा पाणीटंचाई नसली तरी कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. यासंदर्भात नागरिकांना प्राधिकरणाला माहिती दिली. मात्र, अजूनही यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. पाण्यासाठी नागरिकांची ओरड सुरू आहे. नागरिकांनी नगरसेवकांना याबाबत माहिती दिली. मात्र, जीवन प्राधिकरणाकडून नगरसेवकांनाही माहिती दिली जात नसल्याचा आरोप नगरसेवकांचा आहे. कोरोनाचे संकट असताना प्राधिकरणाकडून होत असलेल्या या प्रकाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: शववाहिनीच झाली तिरडीचे खांदेकरी; मृतदेह नेण्यास माणसं तयार होत नसल्याने उपाययोजना

शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. अशा काळात प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन झालेले दिसत नाही. जीवन प्राधिकरणाकडून तब्बल तेरा ते पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. प्राधिकरणाच्या संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी माहिती देत नाही. नागरिकांची अडचण पाहता प्राधिकणासोबत नगरसेवकांची बैठक घ्यावी.
-विजय खडसे, गटनेता, भाजप.

(Huge Water crisis in Yavatmal getting water once in 15 days)