कर्तव्य केले, मतदान राहिले !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

हिंगणा  (जि.नागपूर) : विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी अद्याप टपाली मतपत्रिका मिळालेल्या नाहीत. हा प्रकार नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांत घडला आहे. मतदानानंतर एक दिवस लोटूनही टपाल मतपत्रिकेचा पत्ता नसल्याने
शेकडो कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील शहरी भागात सहा व ग्रामीण भागात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.

21 ऑक्‍टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या कामासाठी हजारो कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने नियुक्ती केली. या कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी टपाल मतपत्रिका पाठविण्यात येतात. मात्र, कर्मचाऱ्यांना अद्याप टपाल मतपत्रिका मिळालेल्या नाही. 22 रोजी सायंकाळपर्यंत कर्मचारी टपाल मतपत्रिकांपासून वंचित होते. हा प्रकार जिल्ह्यातील एकूण बारा विधानसभा मतदारसंघांत घडला आहे. कर्मचारी ज्या विधानसभा मतदारसंघात वास्तव्याला असेल, तेथील निवडणूक प्रक्रिया पार पाडणारी यंत्रणा कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी "स्पीड पोस्ट'ने टपाल मतपत्रिका पाठवते. हा प्रकार मागील लोकसभा निवडणुकीतही घडला होता. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी केली जात आहे. यामुळे पुन्हा या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती 24 रोजी केली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी मतदान केव्हा करावे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. निवडणूक विभागानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास शेकडो कर्मचारी मतदानापासून वंचित राहतील. निवडणूक विभाग याबाबत काय निर्णय घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील सर्वाधिक कर्मचारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात शेकडो कर्मचारी वास्तव्याला आहेत. या कर्मचाऱ्यांना अद्याप टपाल मतपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे हे
शेकडो कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडला असेल तर इतर मतदारसंघात काय स्थिती असेल, याची जाणीव येते. यामुळे टपाल मतपत्रिका तातडीने पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे. निवडणूक निर्णय अधि
कारीसुद्धा याबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसून येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of employees deprived of postal magazines