तुरीचे अनुदान मिळण्यासाठी स्वाभिमानीचे उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

शेगाव : तालुक्यातील 7722 शेतकऱ्यांनी शेगाव तूर खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदनी करण्याकरीता लागणारे सर्व कागदपत्र देऊन सर्व शेतकऱ्यांनी टोकन घेतले. पंरतु यापैकी 1516 शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदनीतुन डावलुन यांना अनुदाना पासुन वंचित ठेवले. अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तुत्वात तहसील समोर शेकडो शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषन सुरु केले आहे.

वास्तविक पाहता या शेतकऱ्यांना टोकन मिळाल्यामुळे ऑनलाईन नोंदी झाल्याचे स्पष्ट झाले. तुर शासन मोजून घेेणार या संभ्रमात सर्व शेतकरी निश्चिंत होते. परंतु शासनाकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांची तुर घरामधेच पडून राहिली. त्यामुळे शासनाने ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी झालेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती.पण आठ महिने उलटून गेल्यानंतर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम आली नाही.

या संदर्भात शेगाव ख.वि.स.कडे चौकशी केली असता आपल्या तुरीची ऑनलाइन नोंदनी झाल्या नसल्याचे ख.वि.स.कडुन शेतक-यांना सांगण्यात आले.वास्तविक पाहता ऑनलाईन नोंदनी करीता सातबारा आठ अ पासबुकची झेरॉक्स आधार कार्ड घोषनापत्र पेरेपत्रक सह लागणारे सर्व रीतसर कागदपत्र देऊन शेतक-यांना टोकन सुध्दा मिळाले होतेे.

परंतु या रितसर केलेल्या सर्व प्रक्रियेतून  शेतकऱ्यांना हेतु पुरस्परपणे वगळण्यात आले असा आरोप उपोषन कर्त्यांनी केला आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदनी झाली नसल्यामुळे या शेतक-यांना अनुदाना पासुन वंचित ठेवले. हा खरोखर दुष्काळाच्या काळात  शेतकऱ्यांची थट्टा करून सर्व शेतकऱ्यांवर शासनाने अन्याय केलेला आहे. त्या करीता ख.वि.स.कडुन टोकन मिळालेल्या शेतकऱ्ंयांच्या बँक खात्यात तात्काळ अनुदानाची रक्कम जमा करा.अशी मागणी उपोषन कर्त्यांनी केली आहे. या उपोषणात जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर,रोेशन देशमुख,स्वाभिमानीचे युवा नेते उमेश शेळके,उज्वल चोपडे,विठ्ठल वखारे,योगेश वखारे,गजानन राऊत,शेख अयाज,अनंता ढगे,गजेंद्र ढगे,शंकर मालठाने,प्रभाकर डकरे,अनिल जवंजाळ,सोपान पाटील,महादेव हेलगे,हरीदास तायडे, संतोष नांदोकार,धनंजय देशमुख,एकनाथ मापारी,सह बहुसंख्य शेतक-यांनी उपोषण सुरु केले आहे.

Web Title: hunger strike by farmers for pulse grant