esakal | क्रूर नियतीचा खेळ! चिमुकल्यांच्या डोक्यावरून क्षणार्धात हरवलं माय-बापाचं छत्र; घडली जीव जाळणारी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Husband and wife are no more in Chandrapur district

पती आणि पत्नी हे घुग्घुस येथील शांतीनगर येथे राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. शनिवारी रात्री ते घराबाहेर पडले.

क्रूर नियतीचा खेळ! चिमुकल्यांच्या डोक्यावरून क्षणार्धात हरवलं माय-बापाचं छत्र; घडली जीव जाळणारी घटना

sakal_logo
By
मनोजकुमार कनकम

घुग्घुस (चंद्रपूर), : वन्यजिवांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एका तरुण जोडप्याचा मृत्यू झाला. ही घटना घुग्घुस येथील शेतशिवारात रविवारी (ता. १७) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. स्वामीदास तक्कला (वय ३०) आणि पत्नी उमेश्‍वरी तक्कला (वय २८) अशी मृतांची नावे आहेत.

मृत पती आणि पत्नी हे घुग्घुस येथील शांतीनगर येथे राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. शनिवारी रात्री ते घराबाहेर पडले. यावेळी सोनबा लक्ष्मण बांदुरकर यांच्या शेतात वन्यजिवांपासून पीक आणि पालेभाज्यांचे रक्षण करण्यासाठी जिवंत विद्युत तारांचा प्रवाह सोडण्यात आला होता. या शेतातून जाताना त्यांना अचानक विद्युत तारांचा स्पर्श झाला. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. 

जाणून घ्या - आधी कापली हाताची नस, रुणालयात जाताना अचानक घेतली उडी अन् घडला थरकाप उडवणारा प्रसंग

ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल गांगुर्डे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांनीदेखील घटनास्थळी भेट दिली. यावेळी हे पती-पत्नी अवघ्या काही अंतरावर मृतावस्थेत आढळून आले. 

अधिक वाचा - प्रेमासमोर जन्मदात्याचा विसर! 'प्लीज पप्पा, तक्रार नका देऊ न' असं म्हणत चाकूहल्ला करणाऱ्या मुलाची घेतली बाजू

घटनास्थळी नागरिक दाखल झाले. जोवर मृताच्या मुलांना मोबदला दिला जात नाही तोवर मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला. त्यामुळे काही काळ येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यासाठी दंगा नियंत्रण पथकालादेखील पाचारण करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाइकांनी ५० लाख रुपयांच्या मोबदल्याची मागणी केली. मात्र पोलीस स्टेशन येथे झालेल्या वाटाघाटींमध्ये नऊ लाख रुपये भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top