संभोग करण्यास पत्नीने दिला नकार मग काय झाले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

नागपूर : शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्याने 47 वर्षीय एसआरपीएफच्या जवानाने 35 वर्षीय पत्नीवर बॅटने हल्ला केला. ही घटना शांतीनगरमधील प्रेमनगर भागात मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी पतीविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 47 वर्षीय जवान केंद्रीय राखीव पोलिस दलात आहे. जम्मू-काश्‍मीर येथे तैनात आहे. तीन दिवसांपूर्वी तो घरी आला. मंगळवारी जवान व त्याच्या पत्नीने जेवण केले. त्यानंतर जवानाने शरीरसंबंधाची मागणी केली. जवानाच्या पत्नीने शरीरसंबंधास नकार दिला. त्यामुळे संतप्त होऊन जवानाने पत्नीच्या डोक्‍यावर बॅटने हल्ला केला. वेळीच जवानाच्या पत्नीने हात आडवा केला. तिच्या हाताला दुखापत झाली. तिला सेंट्रल एव्हेन्यूवरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान,येथील डॉक्‍टरांनी तहसील पोलिसांना घटनेची माहिती दिली. तहसील पोलिसांनी जखमीचे बयाण नोंदवून शांतीनगर पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले. शांतीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. बी. उईके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश गोमासे यांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करून जवानाला अटक केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband Attack Wife