पत्नीच्या विरहात पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

नागपूर : प्रतापनगर ठाण्याअंतर्गत एका व्यक्‍तीने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अनिल रामकुमार गुप्ता (45, रा. लोकसेवानगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनिलचे मोठे भाऊ सुनील यांचा मेसचा व्यवसाय आहे. अनिल आपल्या भावाला कामात मदत करीत होते. अनिलला दारूचे व्यसन होते. 5 महिन्यांपूर्वी पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे व्यसन वाढले. मंगळवारी सायंकाळी त्यांची मुलगी आणि मुलगा बाहेर गेले होते. दरम्यान, अनिल यांनी घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास लावला. रात्री 8 वाजता कुटुंबीयांना ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband commit suicide