गळा आवळून पत्नीचा खून; पतीला कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

अमरावती : पत्नीला मारहाण करून तिचा गळा आवळूत खून केल्याची घटना अंजनगावसुर्जी तालुक्‍यात बोराळा गावात घडली. पोलिसांनी गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

अमरावती : पत्नीला मारहाण करून तिचा गळा आवळूत खून केल्याची घटना अंजनगावसुर्जी तालुक्‍यात बोराळा गावात घडली. पोलिसांनी गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
अवधूत रामभाऊ तायडे (वय 36; रा. बोराळा) असे अटक झालेल्या पतीचे नाव आहे. अंजनगावसुर्जी न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (ता. 14) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. कविता अवधूत तायडे (वय 29) असे मृत महिलेचे नाव आहे. पती अवधूत हा व्यसनी होता. बुधवारी (ता. एक) सायंकाळी तो दारू पिऊन घरी आला. कविताला त्याने चहा करण्यास सांगून तिच्याशी वाद घातला. चहा करण्यास नकार देताच तिला त्याने जबर मारहाण केली. त्यातच गळा आवळल्याने कविताची प्रकृती गंभीर झाली. तिला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा गत गुरुवारी (ता. दोन) मृत्यू झाला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात कविताला जबर मारहाण झाली व तिचा गळा आवळला गेला, त्यामुळे गळ्याचे हाड तुटले. यातच तिचा मृत्यू झाल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे प्रदीप ज्ञानेश्वर मोहोड (वय 31; रा. बाभळी, दर्यापूर) यांनी अंजनगावसुर्जी ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याआधारे पती अवधूत तायडे याच्या विरुद्ध गुरुवारी (ता. नऊ) खुनाचा गुन्हा दाखल झाला. तपास अधिकाऱ्यांनी अवधूतला शुक्रवारी (ता. दहा) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: husband murdered wife

टॅग्स