दारुड्या पतीने केले पत्नीवर कात्रीने वार

husband tried to kill his wife at pavni
husband tried to kill his wife at pavni

पवनी (जि. भंडारा) : पवनी शहराच्या रस्त्यावर पतीने आपल्या पत्नीवर कात्री व चाकूने हल्ला करण्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. 

येथील स्थायिक आबा तुळस्कर यांच्या येथे सुनील प्रकाश रंगारी व पत्नी जयश्री व दोन अपत्यासह भाड्याने राहत होता. सुनील हा कृषि उत्पन्न बाजर समिती येथे लिपिक पदी काम करत होता. परंतू सुनीलला व्यसनाची सवय होती. मद्यपान करून तो नेहमी लहानसहान गोष्टींवर पत्नीसोबत भांडण करायचा. रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आपल्या आईला घरी बोलावून घेतले होते.

काल (ता. 4) पत्नीने महिला समुपदेशन केंद्र पवनी येथे पतीच्या विरोधात तक्रार केली. त्याची माहिती सुनीलला मिळाल्याने, आज (ता. 5) सकाळी 10.30 च्या सुमारास पत्नी पोलीस स्टेशनकडे जाताना मद्यपान करून पत्नीच्या गळ्यावर चाकू ठेवून 'तक्रार परत घे, नाही तर गळा कापेन' अशी धमकी दिली.

पत्नीने विरोध केला असता सुनीलने तिच्या डोक्यावर चाकूने वार केले. घरी असलेल्या सासु विश्रांती मेश्राम यांनी बचाव केला असता त्यांच्या हातावर सुद्धा वार करून जखमी केले. पत्नीने घरातून पोलीसांकडे धाव घेतली असता सुनील याने तिचा पाठलाग करुन सराफा लाइन येथील रस्त्यावर फिल्मी स्टाइलमध्ये येऊन पत्नीच्या शरीरावर कात्रीने सपासप वार केले व तेथून पळ काढला.

प्रत्यक्षदर्शींनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांना माहीती मिळताच, पत्नीला ग्रामीण रुग्णालय येथे दखल केले गेले. जयश्रीच्या हातासह शरीरावर इतर ठिकाणी गंभीर जखमा आहेत. हाताची नस फटली आहे व हात मोडल्यामुळे भंडारा येथील ग्रामीण रुग्णालयात तिला हलविण्यात आले आहे. पवनी पोलिसांनी गुह्याची नोंद केली असून आरोपीचा शोध सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com