वेदनाशमन शास्त्रातून रुग्णहित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नागपूर : वेदनांचे शमन कसे करावे, याचे शास्त्र आहे. याच शास्त्रानुसार आनंदाने वेदनांचे व्यवस्थापन करावे आणि रुग्णांना समाधानी करावे. शल्यक्रियेनंतर होणाऱ्या वेदनांमुळे रुग्ण धास्तावलेला असतो. मात्र, आधुनिक वैद्यकशास्त्रात शरीराला चिरा न देता शल्यक्रिया शक्‍य आहेत. शिवाय रोबोटचा आधार घेतला जातो. वेदनारहित व्यवस्थापनात अचुकता राहते, असा सूर "आयसीआरए- पेन 2019' आंतरराष्ट्रीय परिषदेत पेन मेडिसीन तज्ज्ञांनी केलेल्या चर्चेतून उमटला.

उपराजधानीत 13 ते 15 सप्टेंबर 2019 दरम्यान "दीर्घकालीन दुखणे'वर "आयसीआरए- पेन 2019' परिषद आयोजित केली आहे. "वेदना आणि त्याचे व्यवस्थापना'च्या वैद्यक तज्ज्ञांची संघटना इंडियन सोसायटी ऑफ स्टडी ऑफ पेन नागपूरतर्फे आयोजित या परिषदेचे उद्‌घाटन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते झाले. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया प्रमुख पाहुणे होते. डॉक्‍टरांसाठी रुग्ण बरा होणे, याहून मोठे समाधान नसल्याची भावना त्यांनी व्यक्‍त केली. आंतरराष्ट्रीय परिषदेची थीम "बेसिक ऍण्ड बियॉन्ड' आहे. परिषदेत वेदना आणि त्याचे शमन यावर कार्यशाळा आणि नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी देशातील पेन मेडिसिन क्षेत्रात कार्यरत युवा तज्ज्ञांचा कोलकता येथील दराडिया पेन इन्स्टिट्यूटतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्ष डॉ. सी. एस. चाम यांनी परिषदेची भूमिका मांडली. आयसीआरए-पेन परिषदेमागचा हेतू डॉ. गौतम दास यांनी सादर केला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसह परिषदेत 250 फिजिशियन तसेच बधिरीकरण तज्ज्ञ उपस्थिच होते. परिषदेसाठी डॉ. सी. एस. चाम, डॉ. सुनीता लवंगे, डॉ. बी. एम. राजुरकर, डॉ. अंजली कोल्हे, डॉ. प्रतिभा देशमुख, डॉ. एस. पी. मांजरेकर, डॉ. शेलगावकर, डॉ. उमेश रमतानी, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. अर्चना मुनिश्वर, डॉ. देवयानी ठाकूर, डॉ. हेमा शेर्के, डॉ. किरण व्यवहारे, डॉ. निलोफर शकीर, डॉ. प्रिया सदावर्ते सहकार्य करीत आहेत. डॉ. देवयानी ठाकूर आणि डॉ. उमेश रमतानी यांनी संचालन केले. डॉ. सुनीता लवंगे यांनी आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICRA-PEN 2019 Conference news