अवैधरीत्या सुरू आहे बांबू वृक्षांची तोड, असा आला प्रकार उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

चंद्रपूर : वनविभागाच्या बफर क्षेत्रातील बांबू कटाईला वर्षभरापासून बंदी आहे. मात्र अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात बाबूंची कटाई सुरू असल्याचे समोर आले. चंद्रपूर वनपरिक्षेत्रच्या पथकाने बांबूचे ताटवे घेऊन जाणारी दोन चारचाकी वाहन ताब्यात घेतली. आता वनविभागाचे काही अधिकारी प्रकरण दडपण्याच्या प्रयत्न करीत आहे.

चंद्रपूर : वनविभागाच्या बफर क्षेत्रातील बांबू कटाईला वर्षभरापासून बंदी आहे. मात्र अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात बाबूंची कटाई सुरू असल्याचे समोर आले. चंद्रपूर वनपरिक्षेत्रच्या पथकाने बांबूचे ताटवे घेऊन जाणारी दोन चारचाकी वाहन ताब्यात घेतली. आता वनविभागाचे काही अधिकारी प्रकरण दडपण्याच्या प्रयत्न करीत आहे.

बफर क्षेत्रातील आदिवासींना उपजीविकेसाठी बांबू देण्यात येतो. चंद्रपूर बफरचे विभागीय अधिकारी म्हणून श्री. गुरुप्रसाद रुजू झाले. त्यानंतर बांबू कटाईला मनाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही बांबूची चोरी थांबली नाही. बफर क्षेत्रातील निंबाळा, दुधाळा, बोर्डा ही गावे अवैध बांबू कटाईचे केंद्र झाले आहे. या गावातील नागरिकांना हाताशी पकडून कंत्राटदार बांबूची तोड करतात. त्यापासून तयार झालेले ताटवे आणि इतर वस्तू राज्यभरात पाठविल्या जातात. ताटवे घेवून जाणारी दोन वाहन वनविभागाने ताब्यात घेतली आहे. यातील एक वाहन वलनी मध्ये पकडले. ते वाहन निमगडे यांच्या मालकीचा आहे. यातील माल प्रमोद देवगडेचा आहे. 

काळजी घ्या, नागपुरातील कोरोना संशयितांची संख्या वाढतेय... एकूण संख्या

बफर क्षेत्रातील बांबूवर तस्करांची कुऱ्हाड 
दुसरी कारवाई दुधाळा येथे केली. यातील वाहन बोर्डाचे सरपंच दीपक खनके यांच्या मालकीची आहे. यातील माल भगवान चांदेकर यांच्या मालकीचा आहे. सध्या ही दोन्ही वाहन वनविभागाच्या ताब्यात आहे. दरम्यान बफर मधील हा बांबू नसल्याचे आता वनअधिकारी सांगत आहे. तो बांबू वनविकास महामंडळाच्या क्षेत्रातील असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र वनविकास महामंडळाने बांबू कटाईला परवानगीच दिली नसताना हा बांबू कुठून आला, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

"मैं तूम तिनों की वर्दी उतरवा दूंगा', चायनिज ठेलाचालकाची दादागिरी

दोन वाहन जप्त: वनअधिकाऱ्यांची कारवाई
मागील वर्षभरापासून बांबू कटाईचा अवैध प्रकार वनअधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने सुरू आहे. मात्र आता कारवाई झाल्याने हात झटकण्यासाठी वनविकास महामंडळाच्या नावाचा वापर केला जात आहे, असे एका वनअधिकाऱ्यांने सांगितले. दरम्यान प्रादेशिक वनवृत्ताच्या चिचपल्ली क्षेत्रातील केळझर, गिलबिली, मोहाळी तुकूम आणि आसेगाव येथे बांबू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal bamboo cutting activity recorded in chandrapur