Gas Refill Scam: घरगुती गॅस वाहनांमध्ये भरून देणाऱ्यास पकडले
Nandura News: नांदुरा शहरातील मोबीनपूरा भागात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमधून रिक्षामध्ये गॅस भरताना पोलिसांनी छापा टाकत आरोपीस अटक केली. आरोपीकडून २४ सिलिंडर, रिक्षा व साहित्य जप्त करण्यात आले.
नांदुरा : शहरातील मोबीनपूरा भागात घरगुती व कमर्शिअल सिलिंडरमधून रिक्षामध्ये गॅस भरत असताना एका आरोपीस बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पकडले. ही कारवाई ता.११ जुलै रोजी करण्यात आली आली.