esakal | लॉकडाउन जनतेसाठीच; वाळू तस्करांना मात्र रान मोकळेच
sakal

बोलून बातमी शोधा

vahtuk.jpg

राज्यभरात कोरोना विषाणूच्या आजाराने थैमान घातले असून, अशातच सर्व अधिकारी-कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत व्यस्थ असताना तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात वाळू तस्करांना रान खुले असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व रेती घाट बंद असताना पूर्णा नदीमधून चक्क अकोला-अकोट रोडने चोहोट्टा बाजार परिसरातील केळीवेळी, काटी-पाटी, करोडी, टाकळी, देवर्डा, निजामपूर, पळसोद, किनखेड, दहीहांडा, कुटासा या खेड्यांमध्ये रात्री आणि वेळ साधून दिवसाही वाळू तस्करी होत आहे.

लॉकडाउन जनतेसाठीच; वाळू तस्करांना मात्र रान मोकळेच

sakal_logo
By
रवी वानखडे

तरोडा (जि. अकोला) : राज्यभरात कोरोना विषाणूच्या आजाराने थैमान घातले असून, अशातच सर्व अधिकारी-कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत व्यस्थ असताना तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात वाळू तस्करांना रान खुले असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व रेती घाट बंद असताना पूर्णा नदीमधून चक्क अकोला-अकोट रोडने चोहोट्टा बाजार परिसरातील केळीवेळी, काटी-पाटी, करोडी, टाकळी, देवर्डा, निजामपूर, पळसोद, किनखेड, दहीहांडा, कुटासा या खेड्यांमध्ये रात्री आणि वेळ साधून दिवसाही वाळू तस्करी होत आहे.

क्लिक करा- हे काय ? चक्क दोन पोलिसांमध्येच झाली फ्रिस्टाईल, एक होता वर्दीवर तर दुरसा सुटीवर

माफियांना कोणाचीही भीती नाही
जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचे लिलाव न झाल्यावरही वाळू घाटांवरून वाळू चोरी रोज राजपणे होत असल्याने तालुक्यातील महसूल अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे बोलल्या जात आहे. यांचाच फायदा घेत या परिसरातील अवैध वाळू चोरांना मात्र, चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत. भर दिवसा चोहोट्टा बाजार येथे अवैध वाळूची वाहतूक करून विक्री केली जात आहे. महसूल अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची वाळू वाहतूक करणाऱ्यांना कुठलीही भीती दिसत नाही. घाटांचे लिलाव न झाल्याने, रात्री उपसा करावा लागत असल्याने यासह इतरही कारणाने वाळू तस्करांनी वाळूचे दर वाढून दिल्याने ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून चांगलीच ओरड केल्या जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


अधिकाऱ्यांचा काहीच प्रतिसाद नाही
वाळूची तस्करी बाबत तहसीलदार, मंडळ अधिकारी व इतरांना फोन करून विचारणा करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा-  धोका : एका नगरेवकासह 42 पॉझिटिव्ह, एकाच दिवसातील सर्वाधिक पॉझिटिव्ह अहवाल

तलाठी राहतात अकोल्याला
आजवर परिसरात अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले नाही. म्हणून कारवाई करण्यात आली नाही. परंतु, मुख्यालयी न राहाता अकोल्यावरून ये-जा करत कर्तव्य करणाऱ्या तलाठींना वाळूची वाहतूक कशी दिसेल. बऱ्याच दिवसापासून शासकीय मालमत्तेची खुलेआम चोरी होत असून, यावर एकही कारवाई न होणे हेही नवलच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

नक्की कारवाई होणार
आजवर कधी वाळू चोरी होताना आढळून आले नाही. त्या कारणाने कारवाई झाली नाही. जर कोणी वाळू चोरी करताना आढळल्यास त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल.
-बी.डी. मुळे, तलाठी, चोहोट्टा बाजार.